Conjunctivitis : यंदाच्या वर्षांत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ डोळ्यांचे रुग्ण

प्रौढांपेक्षा लहान शाळकरी मुलांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे

149
Conjunctivitis : यंदाच्या वर्षांत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ डोळ्यांचे रुग्ण
Conjunctivitis : यंदाच्या वर्षांत राज्यात ३ लाख ५७ हजार २६५ डोळ्यांचे रुग्ण

राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यात यंदाच्या वर्षांत ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३ लाख ५७ हजार २६५ एकूण रुग्ण आढळले आहेत. यंदा प्रौढांपेक्षा लहान शाळकरी मुलांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणू संस्था व राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले आहे. हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावता या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डोळे येणे मुख्यत्वे एडिनोवायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. राज्यात साथ सुरू झालेल्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारांसाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.

(हेही वाचा – Rajini the Jailer : रजनीकांतच्या नवीन सिनेमाने पहिल्याच दिवशी सगळे विक्रम हवेत उडवले)

जिल्हानिहाय व महानगर पालिका निहाय रुग्णांची आकडेवारी – 

सर्वांत जास्त डोळ्यांचे रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. बुलढाण्यात ४४ हजार ३९८ रूग्ण, त्यानंतर पुण्यात २८ हजार ०४२, जळगावात २२ हजार ४१७, नांदेड १८ हजार ९९६ डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण आढळून आले.

डोळ्यांच्या संसर्गाच्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी – 

जिल्हा रुग्णसंख्या – 

  • बुलढाणा – ४४ हजार ३९८
  • पुणे – २८ हजार ०४२
  • जळगाव – २२ हजार ४१७
  • नांदेड – १८ हजार ९९६
  • जळगाव – २२ हजार ४१७
  • चंद्रपूर – १५ हजार ३४८
  • अमरावती – १४ हजार ७३८
  • परभणी – १४ हजार ६१४
  • अकोला – १३ हजार ७८७
  • धुळे – १३ हजार २७३
  • वर्धा – ११ हजार ३०३
  • नंदुरबार – १० हजार २९४
  • भंडारा – १० हजार ५४
  • वाशिम – ९ हजार ४५८
  • यवतमाळ – ९ हजार ४४१
  • नांदेड – ८ हजार ८५५
  • मालेगांव – ८ हजार ६५५
  • लातूर – ७ हजार ३९
  • औरंगाबाद – ६ हजार ८३९
  • पुणे – ६ हजार ७२०
  • गोंदिया – ६ हजार ५३२
  • जालना – ६ हजार ५०६
  • पिंपरी चिंचवड मनपा – ६ हजार १०
  • हिंगोली – ५ हजार ७८०
  • नाशिक – ५ हजार ५७५
  • अहमदनगर – ४ हजार ९९२
  • कोल्हापूर – ४ हजार ७०२
  • औरंगाबाद मनपा – ४ हजार ६४३
  • नागपूर मनपा – ४ हजार ६२०
  • सोलापूर – ४ हजार २८२
  • नाशिक मनपा – ३ हजार १८३
  • नागपूर – ३ हजार ६३
  • मुंबई – २ हजार ८६२
  • गडचिरोली – २ हजार ७९६
  • पालघर – १ हजार ९७७
  • उस्मानाबाद – १ हजार ९१०
  • सांगली मनपा – १८४८
  • बीड – १ हजार ६६६
  • सांगली – १ हजार ५४०
  • सातारा – १ हजार ५३८
  • धुळे मनपा – १ हजार ६५
  • रायगड – ८१६
  • नवी मुंबई मनपा – ७९०
  • सिंधुदुर्ग – ६७९
  • लातूर मनपा – ५५५
  • चंद्रपूर मनपा – ४२९
  • ठाणे मनपा – ४१४
  • सोलापूर मनपा – ४०६
  • पनवेल मनपा – ३२४
  • अहमदनगर मनपा – २२३
  • रत्नागिरी – २२२
  • ठाणे – १८६
  • परभणी मनपा – १६६
  • अकोला मनपा – १५१
  • भिवंडी निजामपूर मनपा – १३३
  • वसई विरार मनपा – १३०
  • मीरा भाईंदर मनपा – १०८
  • कोल्हापूर मनपा – ७४
  • कल्याण–डोंबिवली मनपा – ५८
  • उल्हासनगर मनपा – २०

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.