Nawab Malik नवाब मलिक सुटले; पण भाजपाने अजित पवारांचे कान टोचले

नवाब मलिक मनी लॉंड्रिंग प्रकरण

219
नवाब मलिक सुटले; पण भाजपाने अजित पवारांचे कान टोचले
नवाब मलिक सुटले; पण भाजपाने अजित पवारांचे कान टोचले

राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री नवाब मलिक Nawab Malikयांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैद्यकीय कारणावरून दोन महिन्यांसाठी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला. काही वरिष्ठ नेत्यांनी ‘सत्यमेव जयते’, अशा प्रतिक्रियाही दिल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग(money Laundering) प्रकरणावरून मालिकांवर आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजपाची मात्र यामुळे गोची झाली. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सहन करावे लागले. त्यामुळे भाजपासोबत सत्तेत सहभागी होऊनही नवाब मालिकांचे गुणगान गाणाऱ्या नेत्यांना आवरा, आम्हाला अडचणीची ठरेल, अशी भूमिका घेऊ नका, अशा शब्दांत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांचे कान टोचल्याचे समजते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित कुर्ल्यातील भूखंड खरेदी आणि इतर आर्थिक व्यवहाराच्या संशयावरून नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. विशेष म्हणजे त्या वेळी मलिक हे मविआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. गेल्या दीड वर्षात त्यांनी जामिनासाठी वेळोवेळी अर्ज दाखल केले, मात्र ते फेटाळण्यात आले. तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील सर्वच नेत्यांनी मालिकांवर आरोपांची राळ उठवली होती; किंबहुना देशद्रोही असल्याचा हल्लाही चढवला होता.आता मालिकांना जामिन मिळाल्यानंतर अजित पवार गटाने जल्लोष केल्याने भाजपा बॅकफूटवर आली आहे. कारण, ज्याचा देशद्रोही असा उल्लेख केला, त्या व्यक्तीच्या स्वागताला आपला मित्रपक्ष गालिचे अंथरतो आहे, हे भाजपाच्या प्रतिमेला शोभेसे नाही. त्यामुळे नवाब मलिकNawab Malik प्रकरणात आम्हाला अडचणीची ठरेल अशी भूमिका घेऊ नका, असा निरोप भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने अजित पवार यांना पाठविल्याचे कळते.

(हेही वाचा : Kishori pednekar : किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात, आम्हाला आनंद झाला

दीर्घ प्रतिक्षेनंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना न्यायव्यवस्थेने दिलासा दिला, त्याचा आनंद आम्हाला आहे. न्यायव्यवस्थेचा आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत. त्यामुळे दिलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. गेली ३० वर्षे मुंबई शहरात आपल्या कार्यप्रणालीने एक वेगळा ठसा नवाब मलिक यांनी निर्माण केला आहे, होता आणि तो कायम राहिल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.