१० ऑगस्टला जाहीर झालेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं रेपो दर (Repo Rate) जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. तरीही तीन सरकारी बँकांनी आपले कर्जावरील व्याजदर १० अंशांनी वाढवले आहेत. त्यामुळे महिन्याचा हफ्ताही वाढणार आहे.
काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट(MCLR) १० अंशांनी वाढवले आहेत. याचा थेट परिणाम कर्जावरील व्याजदर वाढून मासिक हफ्त्यांवर होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेनं यंदा रेपो रेट जैसे थे ठेवूनही काही बँकांनी कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. Increased interest rates on loans
या आहेत बँका
या बँका आहेत बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक आणि महाराष्ट्र बँक. कर्जावरील किमान व्याजदर. प्रत्येक बँक दर निश्चित करते. आणि त्यानुसार, विविध कर्जांवरील बँकेचे व्याजदर ठरतात. बँकेसाठी वर्षातून एक MCLR ठरवला जातो. आणि या दरापेक्षा कमी दराने कुठलंही कर्ज द्यायला रिझर्व्ह बँकेची त्या बँकेला परवानगी नसते.
या तीन बँकांनी रिझर्व्ह बँकेला कळवल्या प्रमाणे त्यांचा आता ८.७० टक्के झाला आहे. आणि हा नवीन दर १२ ऑगस्टपासून लागू होईल. तर महाराष्ट्र बँकेचा MCLR १० अंशांनी वाढला असला तरी तो आता ८.६ टक्के झाला आहे. त्यांचे नवीन दर १० ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. या बँकांकडून नवीन कर्ज घेणाऱ्यांना नवीन दराने कर्ज घ्यावं लागेल. तर फ्लोटिंग दराने ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांचा मासिक हफ्ता वाढणार आहे. खाजगी बँक HDFC नेही काही दिवसांपूर्वी कर्जावरील व्याजदर वाढवले होते.
मागच्या तीन पतधोरणांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट आहे तोच ठेवला असला तरी कोरोना नंतर आतापर्यंत २५० अंशांनी रेपो दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कर्जाचा मोठा भूर्दंड पडत आहे. अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेनं ताज्या पतधोरणात एक आश्वासन दिलं आहे.
फ्लोटिंग रेटमधून फिक्स्ड रेटमध्ये स्थलांतराची ही योग्य वेळ?
कर्जं दोन प्रकारची असतात. फिक्स्ड व्याजदर आणि फ्लोटिंग व्याजदर. फ्लोटिंग म्हणजे जो ठरावीक कालावधीने बदलण्याचा अधिकार बँकेला आहे. आणि फिक्स्ड म्हणजे कर्ज घेताना ठरलेला व्याजदर जो पूर्ण कालावधीत कायम राहतो.
यापैकी फ्लोटिंग रेट हा जास्त प्रचलित आहे. बँकाची याच दराने कर्ज देऊ करतात. पण, आता व्याजदर सातत्याने वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं फ्लोटिंग दरातून फिक्स्ड दराकडे जायची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ करायचं ठरवलं आहे. लवकरच त्यासाठी मार्गदर्शक तत्त्व बनवू आणि बँक तसंच ग्राहकांसाठी या प्रक्रियेत दुवा म्हणून रिझर्व्ह बँक काम करेल, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community