Hospital Construction : जे. जे. पाठोपाठ आता ‘या’ पालिका रुग्णालयातील बांधकाम रखडले

रुग्णालय परिसरातील जमिनीवर पॅराप्लेजिक संस्था या संस्थेने ठोकला दावा

147
Hospital Construction : जे. जे. पाठोपाठ आता 'या' पालिका रुग्णालयातील बांधकाम रखडले
Hospital Construction : जे. जे. पाठोपाठ आता 'या' पालिका रुग्णालयातील बांधकाम रखडले

जे. जे. या सरकारी रुग्णालयाच्या पाठोपाठ पालिकेच्या सायन रुग्णालयातील नव्या डॉक्टर, परिचारिका आणि नव्या १४ मजली रुग्णालयाच्या बांधकामाचे कामकाज रखडले आहे. रुग्णालय परिसरातील जमिनीवर पॅराप्लेजिक संस्था या संस्थेने दावा ठोकला आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने रुग्णालयाच्या विस्तारीकरणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परिणामी मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयावर वाढत्या रुग्णसेवेच्या ताणावर अद्यापही समाधानकारक उपाययोजना अंमलात आणणे प्रशासकीय यंत्रणेसमोर आव्हान आहे.

जे. जे. सरकारी रुग्णालयात दर दिवसाला साडेसात हजार रुग्ण बाह्य रुग्णविभागाला भेट देतात. जे. जेत राज्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. या वाढत्या रुग्ण संख्येसाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र, मुदत संपूनही जे. जे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे अद्यापही बांधकाम पूर्ण झालेले नाही. या प्रकरणावरून वाद सुरु असतानाच सायन रुग्णालयातील जमीन हस्तांतरणाचा मुद्दा थेट न्यायालयात गेला.

(हेही वाचा – Rishabh Pant Recovery : रिषभ पंत ‘या’ भावूक पोस्टमध्ये कुणाचे आभार मानतोय?)

सायन रुग्णालयातील जमिनीचा वाद –

सन १९९१ साली पालिकेचे तत्कालीन आयुक्त एस. टी. नायकर यांनी सायन रुग्णालयातील जागा तात्पुरत्या स्वरूपात पॅराप्लेजिक संस्थेला वापरण्यास परवानगी दिली, असा दावा सायन रुग्णालय प्रशासनाचा आहे. मात्र, जागा परत मिळवण्यासाठी आदेश दिला असता पॅराप्लेजिक संस्थेने २०१४ साली थेट जागेवर दावा करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च न्यायालयात संस्थेने दुसऱ्यांदा याचिका दाखल केली आहे.

सायन रुग्णालयात मुंबईसह कल्याण ते कर्जत पट्ट्यातील मध्यमवर्गीय माणसे उपचारांसाठी येतात. बरेचदा उपचारांसाठी खाटा उपलब्ध नसल्याने रुग्ण जमिनीवरच चटया घालून डॉक्टरांकडून उपचारांसाठी तयारी दर्शवतात. वाढती रुग्णसंख्या, मनुष्यबळाची कमतरता यामुळे सायन रुग्णालयात स्वच्छतेची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशातच मनुष्यबळ, डॉक्टर आणि परिचारिकांसाठी नवे वसतीगृह आणि १४ मजली नवे रुग्णालय शक्य तितक्या लवकर उपलब्ध व्हायला हवे अशी मागणी आरोग्यसेवा कार्यकर्त्यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.