उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नितीन गडकरी आज म्हणजेच शनिवार १२ ऑगस्ट रोजी पुण्यात उपस्थित होते. पुण्यातील चांदणी चौकाच्या लोकार्पणासाठी हे एकत्र आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना चांगलाच टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, पुणे हे बुद्धीवंतांचे शहर आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प नियोजित केला की कुणी अमेरिकेहून रिपोर्ट आणतं, तर कुणी स्वित्झर्लंड, कुणी जर्मनीहून रिपोर्ट आणून प्रकल्पावर आक्षेप घेतो. पुण्याची भाषा प्रमाण आहे, पण रिपोर्ट कोणता प्रमाण? हे काही लवकर ठरत नाही. यावर निर्णय करता करताच वेळ निघून जातो. त्यामुळे पुण्यातील प्रकल्पांना विलंब होतो.
(हेही वाचा – Hospital Construction : जे. जे. पाठोपाठ आता ‘या’ पालिका रुग्णालयातील बांधकाम रखडले)
पुण्यातील चांदणी चौक रस्त्यांच्या विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. तत्पूर्वी अजित पवारांनी आपल्या भाषणात पुण्याहून आधी नागपूरला मेट्रो झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पुण्यात आधी मेट्रो झाली असती तर आम्ही त्या खचाखच भरून दाखवल्या असता, असे अजितदादा म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले.
#पुणे #Pune #ChandaniChowk #चांदणीचौक #Flyover #maharashtra pic.twitter.com/iKU3JPNRVN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2023
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “पुणे मेट्रोला पहिले मंजूरी मिळाली हे खरे आहे. त्यानंतर नागपूर मेट्रोला मंजूरी मिळाली. पण, पुण्याच्या बुद्धीवंतांनी आक्षेप घेतल्यामुळे पुणे मेट्रोचे काम रखडत गेले. तेवढ्या काळात तर नागपूर मेट्रोचे कामही पूर्ण झाले. आमची गडकरींसोबत नेहमी पुणे मेट्रोबाबत सातत्याने बैठका व्हायच्या. एका बैठकीत तर गडकरींनी स्पष्ट सांगितले की, असेच आक्षेप घेत राहीलात तर तुमची मेट्रो या जन्मात होणार नाही. त्यानंतर कुठे पुणे मेट्रोच्या कामांना वेग आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community