Twitter Video Call : आता ट्विटरवरूनही करता येणार ‘व्हिडीओ कॉल’

248
Twitter Video Call : आता ट्विटरवरूनही करता येणार 'व्हिडीओ कॉल'

ट्विटर (Twitter Video Call) ही कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात ट्विटरला विकत घेतले होते. तेव्हापासून मस्क यांनी ट्विटरमध्ये (Twitter Video Call) अनेक बदल केले. अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीईओ पदाची जबाबदारी मस्क यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर त्यांनी लिंडा यांची सीईओ पदावर नियुक्ती केली. आता पुन्हा एकदा ट्विटरने एक नवीन फीचरची (Twitter Video Call) घोषणा केली आहे.

ट्विटरवरून आता लवकरच युजर्सना आपला नंबर शेअर न करता व्हिडिओ कॉल (Twitter Video Call) करता येणार आहे. कंपनीच्या सीईओ लिंडा यांनी या नवीन फिचरसंदर्भात माहिती दिली.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : फडणवीसांचा पुणेकरांना खोचक टोला; पुणे बुद्धीवंताचे शहर, त्यामुळे निर्णय लवकर होत नसल्याने प्रकल्पांना विलंब)

दरम्यान, ट्विटरच्या (Twitter Video Call) डिझाइनर अँड्रिया कॉनवे यांनी एका पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘आताच ट्विटरवर कुणालातरी कॉल केला.’ तेव्हापासून हे फिचर लवकरच जोडले जाईल असे दावे केले जात होते. त्या दाव्यांना आता ट्विटर कंपनीच्या सीईओनीं सकारात्मक दुजोरा दिला आहे.

एलॉन मस्क यांना बनवायचे आहे ‘हे’ अॅप

एलॉन मस्क यांना ट्विटरसाठी (Twitter Video Call) ‘एव्हरीथिंग’ हे अॅप बनवायचे आहे. या अॅपमध्ये पेमेंट सेवेसह इतर वैशिष्ट्येही जोडली जाणार आहेत. मस्क यांनी लिंडा याकारिनो यांच्या आधीच प्लॅटफॉर्मवर आगामी कॉलिंग फिचरची माहिती दिली होती.

मस्क यांनी लिहीले की, ‘लवकरच तुम्ही तुमच्या हँडलवरुन कोणालाही व्हिडीओ (Twitter Video Call) आणि ऑडिओ कॉल करु शकाल. या नवीन फिचरद्वारे तुम्ही तुमचा नंबर कोणाशीही शेअर न करताही जगात कुठेही असाल तरी संवाद साधू शकाल.’ कंपनीचे मालक आणि सीईओंनी अद्याप व्हिडिओ-ऑडिओ कॉलिंग एन्क्रिप्ट केले जातील की नाही हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.