ऋजुता लुकतुके
ॲपल कंपनीचा सगळ्यात मोठी कच्चा माल पुरवठादार कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn in India) तेलंगाणात आणखी ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने १०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची सुरुवातीची गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत फॉक्सकॉन कंपनीने कोंगारा कालन भागात प्रकल्पाची पायाभरणीही केली आहे.
फॉक्सकॉन (Foxconn in India) ही कंपनी तैवानमधील आघाडीची मायक्रोचिप आणि सेमी कन्डक्टर बनवणारी कंपनी आहे. ॲपल कंपनी आपला सर्वाधिक कच्चा माल फॉक्सकॉनकडूनच घेते. थोडक्यात आता ॲपलसाठी लागणारे स्पेअर पार्टही काही प्रमाणात भारतातच तयार होणार आहेत. शिवाय ॲपल फोनची जुळणी भारतात करण्यासाठी कंपनीबरोबर करार सुरूच आहे. ती निर्मितीही तेलंगाणातच होणार आहे.
पण, सध्या फॉक्सकॉनने (Foxconn in India) तेलंगाणातील गुंतवणूक वाढवणं ही गोष्ट सेमी कन्डक्टर क्षेत्रातील मोठी घटना मानली जात आहे.
फॉक्सकॉन कंपनीचे (Foxconn in India) भारतातील प्रमुख व्ही ली यांनी ट्विटरवरून या नवीन गुंतवणुकीची माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, ‘तेलंगाणा! प्रगती जोरात सुरू आहे. ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलर तुमच्या दिशेनं येत आहेत.’
(हेही वाचा – Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात 21 विधेयक पारित)
ली यांचं हे ट्विट तेलंगाणाचे औद्योगिक मंत्री के टी रामा राव यांनी रिट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर फॉक्सकॉनच्या (Foxconn in India) या गुंतवणुकीविषयी माहितीही दिली आहे.
Our friendship with Foxconn Group remains steadfast, each of us delivering on mutual commitments
With total infusement of $550m (adding previous $150m), FIT is poised to deliver on its promises in Telangana
This once again proves Telangana Speed pic.twitter.com/DOssnhmyRo
— KTR (@KTRBRS) August 12, 2023
रामा राव आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘फॉक्सकॉनबरोबरची (Foxconn in India) आमची मैत्री योग्य दिशेनं आणि वेगाने पुढे जात आहे. तेलंगाणा राज्यात कंपनी ५५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यांनी आम्हाला दिलेलं वचन पाळलं याचा आम्हाला आनंद आहे.’
फॉक्सकॉनच्या (Foxconn in India) नवीन उभ्या राहात असलेल्या कंपनीमुळे राज्यांत २५,००० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तर ही कंपनी फॉक्सकॉनच्या भारतातील उद्योगांवर लक्ष ठेवेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community