Harry Kane : हॅरी केन अखेर टॉटनहॅमकडून बायर्न म्युनिच क्लबमध्ये दाखल

इंग्लिश फुटबॉल कर्णधार हॅरी केन अखेर या हंगामात जर्मन संघ बायर्न म्युनिचकडून खेळणार हे आता स्पष्ट झालं आहे.

285
Harry Kane : हॅरी केन अखेर टॉटनहॅमकडून बायर्न म्युनिच क्लबमध्ये दाखल

ऋजुता लुकतुके

लोकप्रिय फुटबॉल लीग (Harry Kane) इंग्लिश प्रिमिअर लीगला रविवारपासून (१३ ऑगस्ट) सुरूवात होत आहे. या लीगपूर्वी ज्या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. इंग्लिश कर्णधार हॅऱी केन (Harry Kane) टॉटनहॅम हॉटस्पर ऐवजी या हंगामात जर्मनीच्या बुंडेसलीगमधील बायर्न म्युनिच लीगकडून खेळणार आहे. हा व्यवहार दोन संघांमधील खेळाडूंचं हस्तांतरण म्हणून पार पडला आहे.

महत्त्वाचं म्हणजे हा व्यवहार चार वर्षांसाठी आहे. दोन क्लबमध्ये (Harry Kane) वाटाघाटी मागील काही महिने सुरू होत्या. आता ३० वर्षीय केन २०२७ पर्यंत बायर्न म्युनिच संघाकडून खेळेल.

जर्मनीत दाखल झाल्यानंतर केनने (Harry Kane) संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केनच्या चाहत्यांसाठी संदेशही प्रसिद्ध केला आहे.

दोन्ही क्लबनी (Harry Kane) हस्तांतरण करारातील नेमकी रक्कम उघड केलेली नाही. पण, एका मीडिया अंदाजनुसार ती १०० दशलक्ष युरोज इतकी असावी. आणि हा आकडा खरा असेल तर जर्मन लीग बुंडेस लीगामधील हा सगळ्यात मोठा करार ठरेल. यापूर्वी ल्युकास हर्नांडेझला ॲटलेटिको मद्रीदकडून आपल्याकडे वळवताना ८० दशलक्ष युरोज मोजले होते.

(हेही वाचा – Olympics 2026 : … तर 2026 मधील ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये होणार)

हॅरी केननेही (Harry Kane) म्युनिचमध्ये झालेल्या स्वागताविषयी सगळ्यांचे आभार मानले आहेत.

इंग्लिश स्ट्रायकर हॅरी केन (Harry Kane) सुरुवातीपासून टॉटनहॅम हॉटस्पर क्लबकडून खेळतो. अकराव्या वर्षी तो टॉटनहॅम फुटबॉल अकॅडमीत दाखल झाला होता. २०११ मध्ये त्याने सीनिअर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. आणि २०१७ मध्ये आपल्या क्लबला विजेतेपदही मिळवून दिलं.

त्यानंतर मागच्या नऊ वर्षात तो छोट्या कालावधीसाठी लेटन ओरिएंट, मिलवॉल, नॉरविक सिटी आणि लेस्टर सिटी या क्लबकडूनही हस्तांतरण प्रक्रियेतून खेळला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.