IND vs WI T20 : भारतीय खेळाडूंना अमेरिकेबद्दल काय वाटतं?

भारतीय संघ पहिल्यांदाच अमेरिकेत क्रिकेटची मालिका खेळत आहे.

134
IND vs WI T20 : भारतीय खेळाडूंना अमेरिकेबद्दल काय वाटतं?

ऋजुता लुकतुके

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI T20) दरम्यानच्या टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात मियामी इथं होणार आहेत. त्यासाठी १० ऑगस्टला भारतीय संघ मियामीमध्ये पोहोचला आहे. संघासाठी अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचा हा पिहलाच अनुभव असणार आहे.

त्यामुळे अमेरिकेतील दिवस संघ मजेत घालवताना दिसत आहे. भारतीय खेळाडूंना (IND vs WI T20) अमेरिका म्हटल्यावर पहिलं काय आठवतं, असा प्रश्न एका व्हीडिओत भारतीय खेळाडूंना विचारण्यात आला. आणि त्यावर खेळाडूंनी दिलेल्या उत्तराचा एक व्हीडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे काम चांगले – अजित पवार)

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणतो, ‘अमेरिका? अनेकांचं स्वप्न.’

अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, यशस्वी जयसवाल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, शुभमन गिल आणि आवेश खान यांनीही अमेरिका (IND vs WI T20) आणि इथं क्रिकेट खेळण्याविषयीची आपली मतं या व्हीडिओ मधून व्यक्त केली आहेत.

पहिले दोन टी-२० (IND vs WI T20) सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने गयानातील तिसरा टी-२० सामना जिंकून १-२ असा कमबॅक मालिकेत केला आहे. आताही फ्लोरिडातील दोन सामने जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा विचार असेल. फ्लोरिडात मायामी शहरातील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियम इथं पहिल्यांदाच क्रिकेट सामने होत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.