Irla Pumping Station : मिलन सब वेमधील तुंबणाऱ्या पाण्याला ‘हेही’ आहे एक कारण

पुढील वर्षात होईल कायमस्वरुपी समस्या दूर

153
Irla Pumping Station : मिलन सब वेमधील तुंबणाऱ्या पाण्याला 'हेही' आहे एक कारण

सचिन धानजी, मुंबई

विलेपार्ले येथील मिलन सब वेमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने (Irla Pumping Station) इर्ला पंपिंग स्टेशन बनवले असले तरी प्रत्यक्षात या पपिंग स्टेशनला जोडणाऱ्या इर्ला नाल्याचे रुंदीकरण काही भागांमध्ये रखडल्याने या भागातील पाण्याचा निचरा उशिराने होत आहे. त्यामुळे इर्ला नाला अर्थात रसराज नाल्याचे रुंदीकरण अतिक्रमणामुळे रखडल्याने आता या झोपड्या हटवून या नाल्याचे उर्वरीत रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये या नाल्याच्या उर्वरीत भागाचे रुंदीकरण झाल्यास मिलन सब वेसह सांताकुझ पश्चिम, एसव्ही रोड, नानावटी रुग्णालय परिसरांमध्ये तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमचीच निकाली निघणार आहे.

विलेपार्लेप पश्चिम येथील इंदिरा नगर १ मिठीबाई कॉलेजच्या पाठिमागे रसराज नाला अर्थात इर्ला नाल्याचे (Irla Pumping Station) रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्यावतीने सन २०११मध्ये व्ही एम रोड ते ईर्ला मार्केट रोड या दरम्यान ९०० मीटर लांबीचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी या रसराज नाल्याच्या पश्चिमेकडील ७०० मीटर व पूर्वेकडील खादी ग्रामोद्योग जवळ २०० मीटर लांबीच्या नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु पुर्वेकडील उर्वरीत ९०० मीटर अतिक्रमित नाल्याचे बांधकाम आता हाती घेण्यात येत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या नाल्यामध्ये ७ झोपड्या पडून दुर्घटना घडली होती. त्यानंतर येथील धोकादायक झोपड्या रिकाम्या करून त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. या ठिकाणी सुमारे १००च्या आसपास झोपड्या असून या अतिक्रमण नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.

(हेही वाचा

महापालिकेच्या पर्जन्य विभागाच्यावतीने यासाठी निविदा मागवली असून या निविदेमध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २८ टक्के उणे दराने काम मिळवले. यासाठी शेठ कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या नाल्याच्या (Irla Pumping Station) उर्वरीत रुंदीकरण व खोलीकरणासाठी विविध करांसह २१ कोटी २० लाख ५१ हजारांचा खर्च करण्यात येणार आहे. पावसाळा वगळून पुढील १२ महिन्यांच्या कालावधीत केला जाणा आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या नाल्यातील (Irla Pumping Station) पावसाचे पाणी इर्ला पंपिंग स्टेशनला वाहून जाते. या नाल्यांच्या काही भागाचे रुंदीकरण झाले तरी उर्वरीत भागांचे रुंदीकरण व खोलीकरण न झाल्याने पंपिंग स्टेशनला जलदगतीने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे या नाल्याच्या रुंदीकरण झाल्यास पाण्याचा प्रवाह अधिक जलदगतीने पंपिंग स्टेशनच्या दिशेने होईल आणि त्यामुळे सांताक्रुझ पश्चिम, विलेपार्ले पश्चिम आदी भागातील एस व्ही रोड परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल आणि पर्यायाने (Irla Pumping Station) मिलन सब वेमध्येही पाणी तुंबले जाणार नाही,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.