BMC Recruitment : कार्यकारी सहायक पदाच्या परीक्षेला १२० उमेदवार बसलेच नाही!

345
BMC Recruitment : कार्यकारी सहायक पदाच्या परीक्षेला १२० उमेदवार बसलेच नाही!

मुंबई महानगरपालिकेतील लिपिक अर्थात कार्यकारी सहायक पदाच्या रिक्‍त जागांसाठी (BMC Recruitment) महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्यामधून भरती करण्यासाठी १२ ऑगस्‍ट २०२३ ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेमध्ये १२० उमेदवार हे गैरहजर राहिले. त्यामुळे या परीक्षेला एकूण २ हजार ०५३ उमेदवारच बसल्याने आता एक जागेसाठी सरासरी दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचा – Free Medical Treatment : १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत मिळणार मोफत उपचार)

महानगरपालिकेच्या विविध विभाग तथा कार्यालयांमधील कार्यकारी सहायक या संवर्गातील १ हजार १७८ पदांची परीक्षा (BMC Recruitment) शनिवारी (१२ ऑगस्ट) पार पडली. महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांमधून ही पदे भरण्यासाठी शनिवारी दुपारी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. वरळी,पवई, कांदिवली, बेलापूर व नेरूळ येथील केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

एकूण २ हजार १७३ नोंदणीकृत उमेदवारांपैकी २ हजार ०५३ उमेदवार (BMC Recruitment) या परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. तर, १२० उमेदवार अनुपस्थित होते. एकूण २ हजार १७३ उमेदवारांमध्ये दिव्यांग १५० उमेदवारांचा समावेश होता. त्या पैकी १४३ उमेदवार उपस्थित होते. तर, ७ उमेदवार अनुपस्थित होते. सर्व केंद्रावर ही परीक्षा सुरळीतपणे पार पडल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.