ट्रॅव्हल्स एजन्सीच्या नावाखाली परदेशी आणि भारतीय नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याऱ्या एका बोगस कॉल सेंटर वर मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime branch Raid शुक्रवारी छापा टाकला. त्यामध्ये १२जणांना अटक केली आहे. ही कारवाई अंधेरी मरोळ परिसरात गुन्हे शाखेच्या कक्ष ८च्या पथकाने केली असून या केलेल्या कारवाईमध्ये २८लॅपटॉप,४० मोबाईल फोन आणि २ राऊटर असा एकूण साडे सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंधेरी पूर्व मरोळ या ठिकाणी आलेल्या मित्तल कामर्शिया या ठिकाणी एक बोगस कॉल सेंटर चालवले जात आहे. त्या ठिकाणी परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांना कमी किंमतीत विमानाचे तिकीट काढून देण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखा Mumbai Crime branch Raid ( डिटेक्शन १) पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष १० प्रभारी पो. नि.साळुंखे,सपोनि. मधुकर धुतराज,प्रजापती ,प्रभू आणि पथक यांनी शुक्रवारी मरोळ येथील मित्तल कामर्शिया या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, संगणक आणि इतर कागदपत्रे मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह १३जणांना ताब्यात घेतले. महिलेला मात्र नोटीस देऊन सोडण्यात आले आहे . तर इतर १२ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपीचे नाव मृदुल जोशी (३५) असे आहे. इतर आरोपी हे २५ ते २० वयोगटातील असुन नवी दिल्ली आणि मुंबईतील रहिवासी आहेत.
(हेही वाचा –Harry Kane : हॅरी केन अखेर टॉटनहॅमकडून बायर्न म्युनिच क्लबमध्ये दाखल)
सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक
पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले की, या सेंटर मध्ये फसवणुकीचे रॅकेट सुरू होते, ट्रॅव्हल्स एजन्सीच्या नावाखाली या बोगस कॉल सेंटर मधून विमानाने प्रवास करणाऱ्या गरजवंतांना इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर गाठून त्यांना ४० ते ५० टक्क्यात विमानाचे तिकिटे देण्याचे सांगून त्यांच्या कडून ऑनलाइन पैसे उकळून त्यांना बोगस तिकिटे पाठवली जात होती. ही टोळी कॅनडियन आणि भारतातील नागरिकांना आपले लक्ष केले होते. मागील काही महिन्यांपासून या टोळीने अशा अनेक नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community