शुभमन गिल आणि यशस्वी जयसवाल यांच्या १६५ धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने विंडिजने IND vs WI T20I दिलेलं १७९ धावांचं आव्हान १८व्या षटकात फक्त एक गडी गमावून पार केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.
विंडीज दौऱ्यावरील भारतीय संघ नवीन आहे, युवा आहे. अगदी कसोटीपासून ते आता टी-२०IND vs WI T20I मालिकेपर्यंत फलंदाजांची मधली आणि तेज गोलंदाजांची आघाडीची फळी जमवण्यात संघ प्रशासनाचा वेळ गेला. पण, त्यामुळेच मालिकेपूर्वी चर्चा होती की, या मालिकेत मिळालेल्या संधीचा फायदा कोणता युवा खेळाडू उचलतो. आणि आगामी आशिया चषक तसंच एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या संघात कोण दावा ठोकतो. मालिकेतला फक्त एक टी-२० सामना उरलेला असताना आपण निश्चितपणे एक नावं सांगू शकतो. सलामीवीर यशस्वी जयसवाल. कसोटीत पदार्पणात शतक. आणि आता टी-२० सामन्यात दुसऱ्याच सामन्यात नाबाद ८४ धावा ही यशस्वीची या दौऱ्यातील कमाई आहे. टी-२० मध्ये आता रोहीत आणि विराट सारखे अव्वल फलंदाजही निवृत्तीच्या वाटेवर आहेत. अशावेळी यशस्वी आणि शुभमन ही डावी-उजवी जोडी टी-२० क्रिकेटमध्ये भारताचं भवितव्य असू शकते इतकी चमक या जोडीने आज फ्लोरिडातील टी-२० सामन्यात दाखवून दिली. विंडिजच्या १७८ धावांचा पाठलाग करताना या जोडीने आपल्या नैसर्गिक खेळाला कधीही मुरड घातली नाही. यशस्वी पहिल्या चेंडूपासून आक्रमक होता. आणि षटकामागे १० धावांची सरासरी १८ व्या षटकापर्यंत राखत या जोडीने लक्ष्य आरामात पार केलं. दोघांनी १६५ धावांची विक्रमी सलामी दिली. यात यशस्वीचा वाटा नाबाद ८४ धावांचा. तर शुभमन गिल रोमारिओ शेफर्डच्या चेंडूवर षटकाराच्या प्रयत्नात ७७ धावांवर बाद झाला. टी-२०IND vs WI T20I क्रिकेटमध्ये सगळ्या मोठ्या सलामीचा के एल राहुल आणि रोहीत शर्मा यांनी केलेल्या विक्रमाची या दोघांनी आज बरोबरी केली. इतक्या धावा त्यांनी जमवल्या त्या फक्त ९३ चेंडूंमध्ये. यशस्वीने ३ षटकार आणि ११ चौकार लगावले. तर शुभमनने ५ षटकार आणि ३ चौकार.
खरंतर विंडिज संघ अमेरिकेत क्रिकेट खेळलेला आहे. आणि अगदी या मैदानाचीही खेळाडूंना सवय होती. त्यामुळे नाणेफेक जिंकून विंडिज कर्णधार रोमारोव्ह पॉवेल यानं प्रथम फलंदाजी घेतली. तेव्हा हा निर्णय योग्यच वाटला. आणि हार्दिकनेही प्रथम फलंदाजी करायला मिळाली नाही म्हणून नाराजीच व्यक्त केली. पुढे विंडिजने १७८ धावा उभ्या केल्या तेव्हाही ही धावसंख्या मादानावरील सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे आव्हानात्मकच वाटत होती. पण, भारताची फलंदाजी सुरू झाली आणि चित्र पालटलं. पहिल्या दहा षटकांतच विंडिज गोलंदाजांची देहबोली नकारात्मक वाटायला लागली. कारण, दोन्ही युवा फलंदाज एकालाही जुमानत नव्हते. आणि मैदानाच्या आठही दिशांना फटकेबाजी करत होते. म्हणूनच असं वाटून गेलं की कदाचित टी-२० क्रिकेटमध्ये तरी ही भारताची भावी सलामीची जोडी आहे. शुभमन बाद झाल्यावर या मालिकेतला आतापर्यंतचा भारताचा यशस्वी फलंदाज तिलक वर्मा मैदानात उतरला. आणि त्याने यशस्वीबरोबर विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पण, विंडिज संघाने त्यापूर्वीच पराभव मान्य केलेला दिसला. मालिकेत आता २-२ अशी बरोबरी आहे. आणि पाचवा आणि अंतिम सामना याच मैदानावर रविवारी होणार आहे.
(हेही वाचा – Harry Kane : हॅरी केन अखेर टॉटनहॅमकडून बायर्न म्युनिच क्लबमध्ये दाखल)
त्यापूर्वी विंडिज संघाने १७८ धावांचं आव्हान उभं केलं ते दहाव्या क्रमांकापर्यंत फलंदाजांचा भरणा असलेल्या आजच्या संघ निवडीमुळे. कारण, शिमरॉन हेटमायर (६१) आणि शे होप (४५) यांनी मधल्या फळीत आक्रमक आणि भक्कम फलंदाजी करून संघाला दीडशेच्या पार नेलं असलं तरी ठरावीक अंतराने गडीही बाद होत होते. पण, ओडियन स्मिथ नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तोपर्यंत संघात अष्टपैलू खेळाडूंची कमी नव्हती. स्मिथनेही १५ धावा करत संघाला १७५ चा टप्पा ओलांडायला मदत केली. तर दहाव्या क्रमांकावरील अकील हुसेननेही एक चौकार ठोकून ५ धावांवर नाबाद राहण्याची भूमिका बजावली. त्यामुळे विंडिजला ८ गडी गमावून १७८ धावा करता आल्या. भारतासाठी अर्शदीप सिंगने ३८ धावांत ३ बळी घेतले. तर कुलदीप यादवने २६ धावांत २ गडी बाद केले. बाकी अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला. रविवारी विंडिजचा पराभव करून भारताने ही मालिका जिंकली तर ०-२ असा पिछाडीवरून टी-२० मालिका जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community