Wildfire : अमेरिकेत वणवा; 2 हजार इमारती जळून खाक; 49.77 हजार कोटींचे नुकसान

यापूर्वी 2018 मध्ये कॅलिफोर्नियातील कॅम्प फायरमुळे 85 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे 18 हजार घरे, इमारती आणि कार्यालये जळाली होती.

146

अमेरिकेतील हवाई राज्यातील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे 89 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील जंगलात गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात भीषण आग आहे. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. हवाईमध्ये आगीमुळे 49.77 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

माउई आणि लहैना सारख्या शहरांमध्ये 2 हजारांहून अधिक इमारती जळल्या आहेत. गव्हर्नर ग्रीनच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे 15,000 लोकांना त्यांची घरे सोडावी लागतात. दुसरीकडे, आता परतणाऱ्यांना त्यांची जळालेली घरे पाहून धक्काच बसला आहे. हवाईच्या कहलुई विमानतळावरील एक धावपट्टी मदत पुरवठ्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. अधिकारी आणि बचाव कर्मचार्‍यांनी माउईमधील 85% आगीवर नियंत्रण मिळवले आहे. त्याचवेळी, लाहैवा येथील पुलेहू जंगलात लागलेली आग देखील 80% पर्यंत विझवण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जंगलातील आग शहरातील झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचली आहे. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाणी फेकले जात असतानाही जमिनीखालील झाडांची मुळे जळत आहेत, त्यामुळे आग पुन्हा पसरण्याचा धोका आहे. यापूर्वी 2018 मध्ये कॅलिफोर्नियातील कॅम्प फायरमुळे 85 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सुमारे 18 हजार घरे, इमारती आणि कार्यालये जळाली. आगीत 1.53 लाख एकर क्षेत्र जळून खाक झाले.

(हेही वाचा Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधानांनी देशवासीयांना काय केले आवाहन, ज्यामुळे देशभरातून मिळणार प्रतिसाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.