मागील तीन वर्षांपासून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनीनिमित्ताने टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अल्ट्रा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देशभरातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यासाठी मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया केल्या जातात, केमोथेरॅपी, रेडिएशन थेरेपी केल्या जातात. या सगळ्या उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता असते. त्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या कारणासाठी वारंवार रक्ताची आवश्यकता भासत असल्याने यंदाच्या वर्षीही देशाच्या स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत हे शिबीर चालणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहता रक्तदान करण्यासाठी येणाऱ्या दाताचा वेळ जाऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. याअंतर्गत रक्तदाता त्यांच्या नावाची नोंदणी आणि रक्तदानासाठी वेळ आरक्षित करू शकतो, याकरता https://youtoocanrun.com/races/mumbai-ultra-blood-donation/ या लिंकवर नोंदणी करता येऊ शकते.
(हेही वाचा MNS : सीमा हैदरवर चित्रपट काढणा-या निर्मात्याला मनसेचा इशारा)
Join Our WhatsApp Community