Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील सोहळ्यासाठी खादीसह 18 विविध क्षेत्रांतील कारागीर असणार प्रमुख पाहुणे 

119

नवी दिल्ली इथल्या लाल किल्ल्यावर यंदा स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला देशभरातून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेले जवळपास 1800 विशेष निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी भारत सरकारने त्यांना निमंत्रण दिले आहे.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने देशातील 50 खादी कारागीर आणि 18  विविध क्षेत्रांमधील 65 कारागिरांना (विश्वकर्मांना) त्यांच्या सहचरी/सहचारिणीसह स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदवल्यानंतर ही मंडळी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी आयोजित समारंभात सहभागी होतील.

(हेही वाचा Sharad Pawar : पवार कुटुंबात मीच वडीलधारा, म्हणून अजित पवारांना भेटलो – शरद पवार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.