मी या प्रकरणाची सकाळीच माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने संपर्कात होते. वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही खासगी रुग्णालयातूनही आले होते. गंभीर स्थितीत त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्व गोष्टी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. तरीसुद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची सखोल चौकशी होईल, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. १ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान रुग्ण दाखल-कळवा रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यु झाला आहे, त्यातील रुग्ण हे १ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट दरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात ठाणे – ६, कल्याण – ४, भिवंडी -३ आणि उल्हासनगर, साकीनाका, गोवंडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जे रुग्ण दगावले त्यातील काही अपघातग्रस्त काहींनी अल्सर, लिव्हर खराब होणे, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, युरीन इनफेक्शन, आॅक्सीजनची कमतरता, बीपी कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यु झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मृत्यु झालेल्यांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश असून त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. तर इतर मृत्युमध्ये एका ८३ वर्षीय वृध्द महिलेसह ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर उर्वरीतांमध्ये ३३ ते ८३ वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.
(हेही वाचा MNS : सीमा हैदरवर चित्रपट काढणा-या निर्मात्याला मनसेचा इशारा)
Join Our WhatsApp Community