Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे काऊंटी क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक

मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉने आधीच्या द्विशतकानंतर रविवारी डरहम विरुद्ध ७६ चेंडूत १२५ धावांची खेळी केली.

151
Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे काऊंटी क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक

ऋजुता लुकतुके

चेतेश्वर पुजारा प्रमाणेच पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) बॅटही इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये तळपतेय. तिच्या जोरावर सलग दुसरा सामना त्याने त्याचा क्लब नॉर्थम्पटनशायरला जिंकून दिला. डरहॅम विरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने ७६ चेंडूत १२५ धावा केल्या. त्याच्या जोरावर संघाने सामना ६ गडी राखून जिंकला.

या शतकात त्याने तब्बल ७ षटकार आणि १५ चौकार ठोकले. या आधीच्या सामन्यात पृथ्वीने (Prithvi Shaw) द्विशतक केलं होतं.

विशेष म्हणजे नॉर्थम्पटनशायर संघाला विजयासाठी १९८ धावांची गरज होती, यातील १२५ धावा एकट्या पृथ्वीने (Prithvi Shaw) केल्या. त्याचा धडाकाच असा होता की, त्याच्या संघाने २६व्या षटकातच विजयाची औपचारिकता पूर्ण केली. गोलंदाज ल्युक प्रॉक्टरने ३४ धावांत ४ बळी घेत डरहॅम संघाला दोनशेच्या आत रोखण्याचं काम केलं.

(हेही वाचा – Heavy Rain In Himachal Pradesh : दरड कोसळल्याने ३० पेक्षा अधिक भाविक शिव मंदिराखाली अडकले)

गेल्याच आठवड्यात सॉमरसेट विरुद्ध पृथ्वीने (Prithvi Shaw) १५३ चेंडूंमध्ये २४४ धावा केल्या होत्या. आता यात त्याने ११ षटकार तर २८ चौकार ठोकले होते. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याच्या संघाने सॉमरसेटचा ८७ धावांनी पराभव केला होता. पृथ्वी शॉ सध्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांत आहे. २०२१च्या श्रीलंका दौऱ्यातील टी-२० सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

त्यानंतर देशांतर्गत स्पर्धेत (Prithvi Shaw) तो दुलिप करंडक स्पर्धेत खेळला. पण, पश्चिम विभागाकडून खेळताना त्याला चमक दाखवता आली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.