Refusal Of Doctors : त्रासदायी रुग्णांना उपचार देण्यास डॉक्टरांचा नकार

शिवीगाळ आणि अपमानजनक वर्तणूक करणाऱ्या रुग्णाला उपचार देण्यास डॉक्टर नकार देऊ शकतात

161
Military Forces: पुण्यातील सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय करणार सैनिकांना तणावमुक्त !
Military Forces: पुण्यातील सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय करणार सैनिकांना तणावमुक्त !

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण कमी होण्यासाठी आता शिवीगाळ आणि अपमानजनक वर्तणूक करणाऱ्या रुग्णाला उपचार देण्यास डॉक्टर नकार देऊ शकतात. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यांदाच हा बदल करण्यात आला आहे. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती वगळता डॉक्टरांनी कोणत्या रुग्णावर उपचार करायचे आणि कोणत्या रुग्णाला उपचारासाठी नकार द्यायचा याबाबतची मुभा देण्यात आली आहे.

भारतीय वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय आचारसंहिता बदल करण्यात आला. या बदलानुसार, डॉक्टरांना उपद्रवी रुग्णांना उपचारासाठी नकार देण्याचा आणि अपेक्षित शुल्क आकरण्याचा अधिकार आहे. नोंदणीकृत डॉक्टरांकडे अपमानास्पद वागणूक केल्यास त्याबाबत लेखी नोंद करण्याचा देणाऱ्या रुग्ण अधिकार दिला आहे. मात्र, रुग्णावर उपचार देण्याचे मान्य केल्यानंतर डॉक्टर पूर्वसूचना न देता उपचारातून माघार घेता येत नाही किंवा रुग्णांकडे दुर्लक्षही करता येणार नाही.

(हेही वाचा – Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे काऊंटी क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक)

या निर्णयामुळे डॉक्टरांना रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून असुरक्षितता वाटल्यास तातडीने स्वसुरक्षितता म्हणून रुग्णांना उपचारासाठी नकार देण्याचा निर्णय घेण्याची स्वतंत्र मुभा दिल्याने डॉक्टरांच्या विविध संस्थांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे धन्यवाद दिले. मात्र, रुग्णालयीन सेवेचे आव्हान असणाऱ्या पालिका आणि सरकारी रुग्णालयात गर्दीत डॉक्टरांना मुबलक सुरक्षा पुरवणे महत्वाचे आहे असा मुद्दा डॉक्टरांच्या विविध संस्थांनी मांडला.

कित्येक डॉक्टर्स जिवाच्या भीतीने प्रॅक्टिस सोडून बसलेत. त्यांच्याही मनस्थितीवर परिणाम होतो. याबाबत वरिष्ठ यंत्रणांनी पालिका आणि सरकारी रुग्णालयांना अचानक भेटी देत परिस्थिती पाहावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. तर दुसरीकडे रुग्ण नाकरण्याचा सर्वस्वी अधिकार डॉक्टरांना दिल्याने रुग्ण अधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबतीत फेरविचार करण्याची मागणी रुग्ण अधिकार कार्यकर्त्यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.