Prithviraj Chavan : भाजपाकडून शरद पवारांना कृषी मंत्री आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर – पृथ्वीराज चव्हाण

178
Prithviraj Chavan : भाजपाकडून शरद पवारांना कृषी मंत्री आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर - पृथ्वीराज चव्हाण

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यामध्ये झालेल्या गुप्त बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Prithviraj Chavan) पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपने शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात शनिवारी उद्योजक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून भाजपने शरद पवार यांना मोठी ऑफर दिली. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी ही ऑफर नाकारली आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला.

(हेही वाचा – Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९.०५ वाजता होणार)

अजित पवार सोबत आले की, शरद पवार देखील येतील, असा विश्वास भाजपला होता. मात्र, शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांना या दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स देण्यात आल्याचे चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.

गुप्त बैठक का?

– राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार दोनवेळा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. पण, ते उघडपणे. पुण्यातील भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी घडत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
– दरम्यान, अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासंदर्भात ही भेट असल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.