छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विविध इंग्रजी-मराठी पुस्तकांचे संच कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशसच्या विविध संस्था व शाळांना भेट देण्याचे ठरविले होते. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले मॉरिशस मराठी कल्चरल सेंटरचे चेअरमन आणि एमबीसी चॅनलचे चीफ प्रोड्युसर अर्जुन पुतला यांच्याकडे सदर पुस्तकांचे संच नुकतेच सुपूर्द करण्यात आले.
डोंबिवलीच्या पै फ्रेंड्स लायब्ररीच्या भगतसिंग शाखेत याबाबतचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अर्जुन पुतला, कॅबिनेट मंत्री रवींद चव्हाण, देवेंद्र साळी (प्रोटोकॉल ऑफिसर भारत सरकार), पराग कोळी (तबला वादक), दिलीप ठाणेकर (मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन) आणि वाचनालयाचे वाचक उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे संचालक पुंडलिक पै यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर दिपाली काळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
(हेही वाचा – Serial Hoax Caller : पाच महिन्यात ८० ‘हॉक्स कॉल’, सिरीयल हॉक्स कॉलरला अखेर अटक)
यावेळी चव्हाण व पुतला यांनी आपल्या मनोगतात मॉरिशस आणि भारत विशेषत: महाराष्ट्र ह्यांचे ऋणानुबंध अधोरेखित केले. पुतला यांच्या पुढाकाराने मॉरिशसच्या कलावंतांचे महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि काही कार्यक्रम पुढेही योजले जाणार आहेत. त्याचप्रमाणे भारतातून मॉरिशसला भेट देणाऱ्या कलाकार आणि विशेष व्यक्तिमत्त्वांना मॉरिशस येथे व्यासपीठ मिळवून दिले जाते. या सांस्कृतिक आदानप्रदानात पुस्तकांच्या भेटीचा नवीन पैलू जोडला गेला याबद्दल पुतला यांनी समाधान व्यक्त केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community