काही महिन्यांपासून बंद असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा (Pune-Belgaum Airlines) आता पुन्हा सुरू होत आहे. यंदाच्या हिवाळी हंगामात पुण्याहून बेळगावसाठी दोन विमान कंपन्यांची सेवा सुरू होत आहे. पुण्याहून काही मोजक्याच मार्गावर ‘उडान’ योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू झाली होती.
गेल्यावर्षी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही तांत्रिक कारण पुढे करून पुणे-बेळगाव विमानसेवा (Pune-Belgaum Airlines) बंद करण्यात आली होती. सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी पुण्यातील प्रवाशांनी केली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. आता बेळगावमधून लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ऑक्टोबरपासून पुण्याहून बेळगावसाठी दोन कंपन्यांची विमानसेवा सुरू करीत आहे. यात इंडिगो व स्टार एयरची सेवा असणार आहे.
(हेही वाचा – BJP : मित्रपक्षाचे उमेदवारही भाजप ठरविणार)
स्टार एयरची सेवा (Pune-Belgaum Airlines) दैनंदिन असेल, तर इंडिगोची सेवा आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार व शनिवारी असणार आहे. स्टार एयरची सेवा २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बेळगावहून सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल, ते पुण्याला सहा वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. तर पुण्याहून विमानाचे सायंकाळी सात वाजून १० मिनिटांनी उड्डाण होईल, ते बेळगावला (Pune-Belgaum Airlines) रात्री आठ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. ही सेवा दररोज असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community