Raj Thackeray : युतीबाबत अडथळे दूर होतील अन् राज ठाकरे चांगला निर्णय घेतील – दीपक केसरकर

211

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमख राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. याच बैठकीत राज ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले. भाजपाकडून युतीची ऑफर मिळाली आहे पण अद्याप आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या या विधानावर आता विविध नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील यावर आपलं मत मांडलं आहे.

ज्या वेळेला राजकारणात नवीन समीकरण तयार होतं, त्यावेळी अनेक अडचणी येत असतात. अडथळ्यातून पलीकडे जाऊन समविचारी लोक एकत्र येतील याची मला खात्री आहे. राज ठाकरेंचा विचार मराठी माणसांच्या हिताचा असतो. त्याचं भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक उपस्थित असतात. त्यामुळे अडथळे दूर होतील आणि राज ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील, असं दीपक केसरकरांनी सांगितले. मध्यंतरी मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरू होत्या, मनसेची एकला चलो रे ची भूमिका आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बैठकीनंतर राज ठाकरेंना विचारला होता. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, काय वदवून घ्यायचंय? परिस्थितीनुसार गोष्टी घडतात. आता तुम्हाला सवयही झालीय. दोन दिवसांपूर्वी काय बोलले जाते आणि दोन दिवसानंतर काय घडते आता हे पत्रकारांना नवीन नाही. परंतु महाराष्ट्राची प्रताडणा जास्तीत जास्त होणार नाही याची काळजी आमच्याकडून घेतली जाईल. जी घेत होतो ती यापुढेही घेतली जाईल असं सूचक विधान त्यांनी केले.

(हेही वाचा Goa : गोव्याचे मणिपूर घडवण्याचे षडयंत्र; फादर बोल्मेक्स यांच्याकडून शिवरायांचा अवमान, आता पुतळाही फोडला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.