ऋजुता लुकतुके
मागच्या दोन दिवसांत टोमॅटोच्या (Tomato) किमती १२०-१४० रुपये किलोपासून ७०-८० रुपये किलोपर्यंत खाली आल्या आहेत. आता किमती आणखी खाली आणण्यासाठी केंद्रसरकारने नवीन पाऊल उचललं आहे. सरकारी सहकारी संस्था नाफेड आणि NCCF यांना टोमॅटो ५० रुपये किलो विकण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
हा नवीन दर आजपासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून लागू होईल. या संस्थांनी भाजीविक्रेत्यांना ५० रुपये किलोचा भाव लावल्यावर ग्राहकांना निदान ७० रुपयांत टोमॅटो (Tomato) मिळेल अशी अपेक्षा आहे. सहकारी संस्थांचा भाव यापूर्वी ७० रुपये किलो होता. दरम्यान बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढावी यासाठीही या दोन संस्था प्रयत्न करत आहेत.
NCCF ने उत्तर भारतात आणि राजधानी दिल्लीच्या जवळ विक्रेत्यांना मुबलक टोमॅटो (Tomato) मिळावा यासाठी ७० केंद्र उभारली आहेत. तिथून भाजी विक्रेते टोमॅटो उचलू शकतात. या दोन संस्थांनी मिळून १३ ऑगस्टपर्यंत १५ लाख किलो टोमॅटो विक्रीसाठी साठवले आहेत. आता हळू हळू हा साठा विक्रेत्यांमार्फत भाजी बाजारात पोहोचवला जाईल.
(हेही वाचा – PM Narendra Modi : आगामी एक हजार वर्षांत भारत कसा असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले अमृत कालखंडाचे महत्व)
यापूर्वी नाफेड आणि NCCF या संस्थांनी जमा केलेल्या टोमॅटोचा (Tomato) दर किलोमागे ९० रुपये किलो ठेवण्यात आला होता. १६ जुलैला तो ८० रुपये करण्यात आला. २० जुलैपासून हाच दर ७० रुपये प्रती किलो सुरू होता. आता केंद्रसरकारने पुन्हा एकदा हस्तक्षेप करून हा दर ५० रुपये प्रती किलोवर आणला आहे.
नवी दिल्ली, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये टोमॅटोला (Tomato) मोठी मागणी आहे. आणि नाफेड तसंच NCCF ने इथल्या बाजारपेठांमध्ये टोमॅटो पुरवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यात देशांतर्गत टोमॅटो उत्पादनही आता सुरळीत होत असल्याचं समजतंय.
नेपाळमधून भारतात आलेल्या टोमॅटोचं (Tomato) वितरणही उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community