ऋजुता लुकतुके
देशातील आघाडीच्या बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था इलेक्ट्रिक बाईकसाठी (Electric Bike) कर्ज उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या किंमती वाढत असल्या तरी ग्राहकांना त्या विकत घेणं शक्य होऊ शकेल.
ई-दुचाक्यांची (Electric Bike) मागणी दिवसेंदिवस वाढतेय आणि त्याचा परिणाम म्हणून सध्या त्यांच्या किंमतीही वाढत आहेत. कारण, अजूनही सेमी कन्डक्टर आणि इलेक्ट्रिक पॅनल भारतात बनत नाही. त्यामुळे ई-दुचाकी उत्पादन कंपन्यांनीच वित्तीय संस्थांशी १००% रकमेपर्यंतच्या कर्जासाठी करार करायला सुरुवात केली आहे.
देशातील सगळ्यात मोठी ई-दुचाकी (Electric Bike) कंपनी ओला इलेक्ट्रिक यांनी श्रीराम फायनान्स सिटी युनियनसोबत करार केला आहे. तर एथर कंपनीने आयडीएफसी फर्स्ट, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, हीरो फिनकॉर्प तसंच चोलामंडलम फायनान्स या कंपन्यांशी करार केला आहे. गेल्याच आठवड्यात हीरो इलेक्ट्रिक कंपनीनेही आयडीएफसी फर्स्ट बँकेशी करार केला होता.
एथर एनर्जीचे सहसंस्थापक तरुण मेहता यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, ‘इलेक्ट्रिक (Electric Bike) गाडयांची मागणी आता इतर कुठल्याही दुचाकीं इतकीच जास्त आहे. आणि वित्तीय संस्थांसाठी हे उत्पादन नवीन होतं. त्यामुळे या नवीन क्षेत्रात आता बँका तयारीनिशी उतरत आहेत.’
ई-दुचाक्यांच्या किमती का वाढणार?
यापूर्वी केंद्रसरकारने ई-दुचाक्यांच्या (Electric Bike) उत्पादनावर अनुदान देऊ केलं होतं. पर्यावरणपूरक ई-वाहनांना चालना मिळावी यासाठी सरकारने दर किलोवॅट प्रतीतासासाठी १५,००० रुपयांचं अनुदान दिलं होतं. अलीकडेच सरकारने ते १०,००० रुपयांवर खाली आणलं आहे. अनुदानाची कमाल मर्यादाही ४० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर खाली आणली होती.
(हेही वाचा – Hindustan Post Impact : तुरुंगात रवानगी होणाऱ्या आरोपींची सक्तीची ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंद)
त्यामुळे दुचाक्यांची (Electric Bike) किंमत हळू हळू वाढणार आहे. त्यावर उपाय म्हणून कंपन्यांनी ग्राहकांना परवडेल असा किंमतीत मॉडेल बनवण्याबरोबरच कर्जाची सोय करण्याकडेही लक्ष दिलं आहे.
किती मिळेल कर्ज?
एथर कंपनीने केलेल्या बँकांबरोबरच्या करारानुसार एक्स रोड किमतीच्या १००% पर्यंतचं कर्ज तुम्हाला दुचाकीवर मिळू शकेल. सध्या इतर दुचाक्यांच्या तुलनेत ई-दुचाकीची (Electric Bike) मागणी आणि त्यासाठीच्या कर्जाची मागणी कमीच असल्यामुळे दुचाकीवर मिळणाऱ्या कर्जाच्या दरापेक्षा हा दर जास्त असेल.
८-१० टक्के दराने ६ महिने मुदतीच्या कर्जासाठी ८,००० रुपयांचा हफ्ता बसू शकतो. ई-दुचाकींची (Electric Bike) किंमत ही साधारणपणे सव्वा लाख ते दीड लाखांपासून सुरू होते. काही कंपन्यांची एंट्री लेव्हल मॉडेल ही ८०-९० हजारांना आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community