स्वातंत्र्य चळवळीची (Independence Day 2023) सुरुवात भगूरवासी सावरकर बंधूंनी केली याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यांना नेहमीच उपेक्षित ठेवले गेले. सावरकर ही केवळ चळवळ नसून हा एक विचार आहे. या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांनी पुढे काम करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (सावरकर वाडा) भगूर येथे भारतीय सैनिक नायक महेश सोनवणे यांनी ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी केले. यावेळी शामकांत गोसावी सहआयुक्त नाशिक यांची विशेष उपस्थिती होती.
(हेही वाचा – Independence Day Ceremony : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कर्नल नरेंद्रनाथ सुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण)
कार्यक्रम प्रसंगी (Independence Day 2023) सावरकरांच्या प्रतिमेस नायक महेश सोनवणे व शामकांत गोसावी यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. या प्रसंगी वंदे मातरम, भारतमाता की जय, राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर अशा घोषणांनी सावरकर वाडा दुमदुमून गेला.
भगूरच्या सावरकर वाड्यात स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) साजरा होणे हा माझ्यासाठी सर्वांत मोठा क्षण आहे. सावरकर स्मारकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अशा विविध उपक्रमातून युवा पिढीला जोडण्याचा चांगला प्रयत्न आहे. सावरकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी मी यापुढेही नक्कीच प्रयत्न करीन, असे नायक सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्याचे (Independence Day 2023) सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी केले. यावेळी सावरकर स्मारकाचे मनोज कुवर, भूषण कापसे, व आकाश नेहेरे, खंडु रामगडे, ओम देशमुख, शंकर मुंढारे, मंगेश मरकड, सुनील जोरे, आशिष वाघ, प्रविण वाघ, विजय घोडेकर, आकाश कुवर, सार्थक मरकड, बंटी आंबेकर आदि उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community