ऋजुता लुकतुके
भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजरातीने मानाच्या बुद्धिबळ विश्वचषक (FIDE Chess World Cup) स्पर्धेत उपउपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे यासाठी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या रशियाच्या इयान नेपोनिमियाची याचा टायब्रेकरवर पराभव केला.
दोघांमधले (FIDE Chess World Cup) दोन्ही सामने बरोबरीत सुटल्यानंतर पुढे कोण जाणार याचा फैसला टायब्रेकरवर होणार होता, आणि १० मिनिटांच्या रॅपिट खेळात विदितने इयानला अक्षरश: धूळ चारली. २-० असा अनपेक्षित विजय मिळवत त्याने उपउपान्त्य फेरी गाठली. विशेष म्हणजे या स्पर्धेत ही मजल मारणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी डी गुकेश, प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी यांनी रविवारीच (१३ ऑगस्ट) ही किमया केली.
एरिगसी आणि प्रज्ञानंद हे उपउपान्त्य (FIDE Chess World Cup) फेरीत एकाच ड्रॉमध्ये आहेत. त्यामुळे एकातरी भारतीयाचा उपान्त्य फेरीतील प्रवेश नक्की आहे. स्वत: विदितची उपउपान्त्य फेरीत खेळण्याची ही दुसरी वेळ असेल.
Vidit about four Indians in the #FIDEWorldCup quarters:
“We are doing very well, what can I say! Everybody is showing very high level of play. Pragg defeated Hikaru which is not easy. Arjun was very clinical with his wins, especially against Sindarov. Gukesh won with Black… pic.twitter.com/IhSi93hI6z— International Chess Federation (@FIDE_chess) August 14, 2023
तर भारतीय संघासाठी एकाच वेळी चौघे उपउपान्त्य (FIDE Chess World Cup) फेरीत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याविषयी बोलताना विदित म्हणतो, ‘मी काय बोलणार? आमची कामगिरी खरंच चांगली होतेय. प्रत्येक जण उच्च दर्जाचा खेळ करतो आहे. प्रग्या आणि अर्जुन यांचे सामने सोपे नव्हते. तर गुकेश काळ्या मोहऱांनी खेळतानाही जिंकला. ते सोपं नाही.’
विदितचा (FIDE Chess World Cup) पुढचा मुकाबला अझरबैजानच्या निजत एबासोवशी होणार आहे. तर गुकेश आणि मॅग्नस कार्लसन दरम्यानच्या सामन्याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. यापूर्वी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अलीकडेच गुकेशने कार्लसनला हरवलं आहे. आधी म्हटल्याप्रमाणे अर्जुन आणि प्रग्यानंद उपउपान्त्य फेरीत आमने सामने असतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community