BMC : कचरामुक्त…!, प्रदुषणमुक्त….! आणि गतिमान मुंबई’ चा मुंबई महापालिका आयुक्त चहल यांचा नारा

166
BMC : कचरामुक्त...!, प्रदुषणमुक्त....! आणि गतिमान मुंबई' चा मुंबई महापालिका आयुक्त चहल यांचा नारा

भारत देशाच्या स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिनानिमित्त भारतातील अग्रगण्य महानगरपालिकांपैकी एक असलेल्या (BMC) मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील जनतेला शुभेच्छा देत सर्व धर्म समभाव जोपासून, मुंबई शहराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु या. तसेच ‘कचरामुक्त मुंबई, प्रदुषणमुक्त मुंबई आणि गतिमान मुंबई’ यासाठी एकत्र येत प्रयत्न करुया असे आवाहन केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त महापालिका मुख्यालय (BMC) इमारतीत भाषण करताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी उपस्थित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, माजी महापौर, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि मुंबई शहरातील समस्त जनतेला संबोधित केले. त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.

भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी प्राणांची आहुती दिलेल्या आणि ब्रिटिश सत्तेपासून हया भारतभूमीला मुक्त करण्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण केलेल्या सर्व राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्राभिमानी हुतात्म्यांना सर्व प्रथम त्यांनी अभिवादन केले.

भारतमातेच्या संरक्षणार्थ अविरत कार्यरत असलेले भूदल, नौदल आणि वायुदल यांनीही त्यांनी मानवंदना दिली. ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. या अभियानानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने (BMC) देखील मुंबईत दिनांक ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

(हेही वाचा – PM Narendra Modi : सोनेरी इतिहासाला जन्म देण्याची हीच योग्य वेळ : पंतप्रधान मोदी)

बुधवारी ९ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे या अभियानाचा मुख्य सोहळा पार पडला. या अभियानामध्ये मुंबईतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, तसेच यंदाही १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन (BMC) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून त्यांनी केले.

महानगरपालिकेमार्फत (BMC) गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, घरघंटी, मसाला कांडप यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात आले. या माध्यमातून एकूण २६,८५५ महिलांना यंत्रसामुग्रीचे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरणाचा समतोल

गणेशोत्सवामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शाडूच्या गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करुन पर्यावरणाचा समतोल राखावा, असे मुंबईतील नागरिकांना त्यांनी (BMC) आवाहन केले आहे.

आपल्या देशाची लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच नागरिकांचा सर्व स्तरावर सक्रीय सहभाग अपेक्षित असून आपला मतदानाचा अधिकार बजाविणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. १८ वर्षावरील प्रत्येक भारतीयाने मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करुन भारतीय लोकशाहीने दिलेला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावावा, असेही त्यांनी आवाहन केले.

मुंबईचा इतिहास येथील कला, संस्कृती, शैक्षणिक सुविधा, भौगोलिक महत्त्व, पुरातन वास्तू, पर्यटन स्थळे तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी यामुळे मुंबई शहराची प्रतिमा जगामध्ये उंचावलेली आहे. त्यामुळेच सर्व धर्म समभाव जोपासून, मुंबई शहराचा अधिकाधिक विकास होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करु असेही आवाहन त्यांनी भाषणाच्या शेवटी केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.