महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० (Special Mission Rainbow 5.0) या लसीकरण मोहीमेची पहिली फेरी १०० टक्के यशस्वी केली आहे. पहिल्या फेरीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ० ते ५ वयोगटातील २,६३८ मुलांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. पैकी २,८०६ बालकांचे व २९६ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ (Special Mission Rainbow 5.0) मोहीम यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृती दल आणि मुंबईतील सात अतिजोखीमग्रस्त विभागांची बैठक घेण्यात आली होती. तसेच २४ प्रशासकीय विभाग स्तरावर विभाग कृती दल बैठक घेण्यात आली होती.
(हेही वाचा – Rohit Pawar : एमआयडीसीची मागणी करणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या निर्णयाला गावातूनच होतोय विरोध)
त्यानुसार मुंबईत ७ ते १२ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम (Special Mission Rainbow 5.0) राबवली. या मोहिमेची दुसरी फेरी दिनांक ११ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान राबवण्यात येणार आहे.
मोहिमेच्या (Special Mission Rainbow 5.0) या पहिल्या फेरीचे अंगणवाडी सेविकांचा तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता. याच कालावधीत नियमित लसीकरणाचा विचार करता एकूण १,४०६ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ० ते ५ वयोगटातील ११,५३९ बालकांचे व १,२०० गरोदर मातांचे नियमित लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community