BMC : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये नवीन १५ दवाखान्यांची भर

138

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या संख्येत नवीन १५ दवाखान्यांची भर पडली आहे. यामुळे आपला दवाखान्यांची संख्या आता १८७ झाली आहे. यामध्ये २७ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १६० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २५० पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे पालिका आरोग्य विभागाने सांगितले.

प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण अंतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना कार्यान्वित करण्यात आली. मुंबईकर नागरिकांना घरानजीक, अधिकाधिक सुलभरीत्या आणि मोफत उपचार देण्यासाठी या दवाखान्यांची उभारणी करण्यात आली. दवाखान्यांची संख्या १७२ होती. ज्यात २५ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १४७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचा समावेश होता. त्यात आजपासून १५ नवीन दवाखाने आरोग्य सेवेतील रुजू झाल्याने ही संख्या आता १८७ झाली आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला आहे. महानगरपालिकेकडून यंदाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण २५० आपला दवाखाना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे उपायुक्त, आरोग्य विभाग संजय कुऱ्हाडे म्हणाले.

(हेही वाचा Independence Day 2023 : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण)

तर आरोग्य विभागाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक सुटी आहे. गुरुवारपासून नवीन सर्व दवाखान्यांच्या माध्यमातून देखील आरोग्य सेवा सुरू करण्यात येतील, असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.