Tomato : टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याची केंद्राची NCCF – NAFED ला सूचना

143

बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोचे दर किलो मागे १४० – १६० रुपये आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. याची अखेर केंद्राने दखल घेतली आहे. केंद्राने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्राने यासंबंधी एनसीसीएफ व नाफेडला टोमॅटोची विक्री 50 रुपये किलो ह्या दराने करण्याची सूचना केली आहे.

जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीमुळे जुलै महिन्यातील अन्नधान्य महागाईचा दर 11.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने टोमॅटोची प्रतिकिलो 50 रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने NCCF व NAFED (नाफेड) टोमॅटो 50 रुपये किलो दराने विकण्याची सूचना केली आहे. गत काही दिवसांपासून घाऊक बाजारात टोमॅटोच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

(हेही वाचा FIDE Chess World Cup : विदित गुजराती ठरला मानाच्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपउपान्त्य फेरीत दाखल होणारा चौथा भारतीय

काही राज्यांत टोमॅटो स्वस्त

मंत्रालयाने सांगितले की, गत 14 जुलैपासून दिल्ली व एनसीआरमध्ये टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू झाली आहे. गत 13 ऑगस्टपर्यंत नाफेड व NCCF ने किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी व विक्री केली आहे. दिल्ली NCR शिवाय राजस्थानच्या जोधपूर, कोटा, उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज व बिहारमधील पटना, मुझफ्फरपूर, आराह, बक्सरमध्ये टोमॅटो स्वस्त दरात विकले जात आहेत.

असे उतरले दर

एनसीसीएफ व नाफेडने प्रथम टोमॅटो 90 रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे दर प्रथम 80 व त्यानंतर 70 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले. आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो 50 रुपये किलोने विकला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.