BMC : अतिरिक्त आयुक्तांच्या रुग्णालय भेटींमुळे कामगार संघटनांमध्ये खुशी

261

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी भेटी देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक वेळा त्यांनी रुग्णालयांमध्ये भेटी दिल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. मात्र, त्यांच्या या भेटींमुळे कामगार संघटनांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे. या भेटीबाबत दि म्युनिसिपल युनियनने अतिरिक्त आयुक्त शिंदे यांचे अभिनंद केल्यानंतर आता म्युनिसिपल मजदूर युनियननेही त्यांचे खास पत्र लिहून अभिनंदन केले आहे.

म्यनिसिपल मजदूर युनियनचे सहसरचिटणीस प्रदीप नारकर यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांना पत्र लिहून, आपण आपल्या पदाचा कोणताही बडेजवापणा न  आणता सर्वसाधारण नागरिकाप्रमाणे सर्व बाबतीत काटेकोरपणे पाहणी करून त्याबाबतच्या सूचना वजा आदेश देऊन आपल्या रुग्णालय व आरोग्य खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम हाती घेतलेले आहे, त्याबद्दल सर्व अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व समस्त कामगार, कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही आपले अभिनंदन करीत आहोत,असे म्हटले आहे.

 त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या, अडचणी व मागण्या याबाबत आपण स्वतः लक्ष घालून त्यांचेही त्वरित निराकरण होतील अशा आशा पल्लवीत मुंबई कार्यक्षेत्रातील लोकसंख्या पाहता व रुग्णसंख्येच्या मानाने सध्या असलेले महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसूतीगृह, सुतिकागृह अपुरी पडत आहेत. खाटांची संख्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे असलेल्या खाटा अपुऱ्या पडत आहेत. के. ई .एम.रूग्णालय, लो. टी. म. स. (सायन) रूग्णालय, बा. य. ल नायर रुग्णालय व कुपर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, भगवती रुग्णालय, भाभा रुग्णालय शताब्दी रुग्णालयांसह या सर्व मोठ्या रुग्णालयांसह छोट्याही सर्व रुग्णालयांमध्ये जेवढे रुग्ण खाटेवर ठेवले जातात त्यापेक्षा अधिक रुग्णांना खाटांअभावी व्हरांड्यात/ फ्लोअर बेडवर ठेवले जात आहेत अशी व्यथाही त्यांनी मांडली आहे.

(हेही वाचा BMC : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये नवीन १५ दवाखान्यांची भर)

एकूणच गेल्या केल्या काही वर्षांमध्ये रुग्णांची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असतानाही कामगार, कर्मचाऱ्यांची संकेत मात्र वाढ झालेली नाही उलट सेवानिवृत्त झालेल्या कामगार कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसल्यामुळे दिवसेंदिवस कामगार, कर्मचारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे. शहर आणि उपनगरीय रुग्णालयातील कामगारांना रुग्णांच्या वाढलेल्या प्रचंड संख्येमुळे कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. रुग्ण संख्येच्या प्रमाणात कामगारांची संख्या वाढविण्याऐवजी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.

परिणामी शहर आणि उपनगरी रुग्णालयातील सध्या कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड बोजा पडत आहे विविध संवर्गातील पदोन्नती पदे रिक्त ठेवण्यात आलेले आहेत.  ही पदे वेळोवेळी प्रसारित होणारी परिपत्रक, नियम, अटी शर्तीमुळे भरण्यात विलंब लागत आहे. मात्र प्रशासनाच्या कामात खोळंबा नको व  रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून  अधिकचा मोबदला न घेता कामगार, कर्मचारी काम करून प्रामाणिक सेवा बजावत आहेत.

आस्थापनेवरील रिक्त पदे कायमस्वरूपी न भरता कंत्राटी  पद्धतीने कंत्राटी कामगारांची भरती केली जात आहे, तसेच सेवा कालावधीमध्ये तीन स्तरीय आश्वासित प्रगती योजना (कालबद्ध पदोन्नती) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून घेणे, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्व संवर्गातील रुग्णालयीन कामगार, कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची सेवानिवासस्थाने मिळवून घेणे, कामगार, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती पश्चात प्रशासनाकडून देण्यात येणारे देय्य दावे मिळण्याकरिता प्रचंड कालावधी लावला जात आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत असून वारंवार कार्यालयांमध्ये खेटा माराव्या लागत आहे. तसेच सध्या कार्यरत  कामगार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कामे करावी लागत असल्यामुळे त्यांना तणावांमध्ये काम करावे लागत आहे,अशीही बाब अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.