BMC : महापालिकेत ‘या’ २२६ पदांसाठी भरती: ४ सप्टेंबरपर्यंत मागवले ऑनलाईन अर्ज

441

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कनिष्ठ लघुलेखक अर्थात ज्युनिअर स्टेनो या संवर्गातील एकूण २२६ पदे भरण्यात येणार असून यासाठी १५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांसह विभागांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी व मराठी) या संवर्गातील एकूण २२६ पदे भरण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/ for prospects/Recruitment/Chief Personal Officer या संकेतस्थळावर याबाबतची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संकेतस्थळावर जावून इच्छुक उमेदवारांनी त्यातील नमुद ठिकाणी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

(हेही वाचा BMC : परवाना पद्धतीत सुधारणा; महापालिकेने नेमली ९ जणांची समिती)

ही जाहिरात १५ ऑगस्ट २०२३ ते ४ सप्टेंबर २०२३ या कालावधीकरीता संकेतस्थळावर उपलब्ध राहील. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून त्यातील अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन, परिपत्रकासोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पध्दतीने, निश्चित वेळेत सादर करावा. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अजार्ची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ सकाळी ०९ ते सायंकाळी ०६ यावेळेत कॉलसेंटर भ्रमणध्वनी क्रमांक 1800222366/18001034566 तसेच आय.बी.पी.एस. वा संस्थेच्या संकेतस्थळावर ‘IBPS Candidate Grievance Redressal System’ ही लिंक उपलब्ध असेल.

  • भरायची एकूण पदे : २२६
  • वेतनश्रेणी सुधारीत : २५,५०० ते ८१,१०० रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.