जुलै महिना पावसाने चांगलाच गाजवला. ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस मात्र अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर परतल्याचे स्पष्ट होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हिमालयाच्या दिशेने गेलेले मान्सूनचे वारे आता पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये येणार असून, महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, येत्या २४ तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषत: विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटांसह पाऊस हजेरी लावेल.
एकीकडे विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवलेली असतानाच, दुसरीकडे राज्याच्या उर्वरित भागांवर मात्र काळ्या ढगांची चादर कायम रहाणार आहे. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार, सद्यस्थितीत मान्सुनच्या वाऱ्यांची स्थिती पहाता, कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत पट्टा आणि कोमोरिन भागापर्यंतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो सक्रिय होत आहे. त्यामुळे राज्यात मान्सुन पुन्हा सक्रिय होताना दिसतोय.
(हेही वाचा – chocolate : चॉकलेट खायचे जसे तोटे तसे फायदेही जाणून घ्या…)
मुंबईसह कोकणात रिपरिप –
मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरांमध्ये मात्र पावसाची रिपरिप पहायला मिळेल. पावसाच्या मुसळधार सरीही अधूनमधून बरसण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचे चित्र काहीसे असेच असेल. ढगाळ वातावरणामुळे दमट वातावरणाची तीव्रता जाणवणार असून, तापमानात काही अंशांची वाढही नोंदवली जाऊ शकते. थोडक्यात पाऊस परतला असला तरीही त्याचा लपंडाव मात्र अजूनही सुरुच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community