काल म्हणजेच मंगळवार १५ ऑगस्ट रोजी देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे काही तरुणांकडून देशाचा अपमान करण्यात आला. मुंबईमधील दोन तरुणांनी (Crime) पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टेटस म्हणून ठेवली. यामुळे मुंबई [पोलिसांकडून दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुलाबा पोलिसांनी (Crime) ही कारवाई केली. अटकेतील दोन्ही तरुण हे १९ वर्षांचे असून महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. कायदेशीर कारवाई केल्यानंतर दोघांनाही समज देऊन सोडण्यात आलं आहे.
(हेही वाचा – Western Local Train Block : आठवड्याच्या मध्येच पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक; डहाणू लोकल आज अंशत: रद्द)
व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश चव्हाण या कुलाबा मार्केटमधील व्यापाऱ्याने काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टेटस स्टोरी पोस्ट केल्याची पोलिसांत तक्रार केली. या (Crime) इंस्टाग्राम स्टोरीमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार त्यांनी 14 ऑगस्ट रोजी नोंदवली होती. त्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्याच्या एटीएस पथकाने सोमवारी रात्री उशिरा कुलाबा मार्केटमध्ये जाऊन संबंधित दोन तरुणांना ताब्यात घेतले.
मोबाईल फोन जप्त केले
पोलिसांनी (Crime) त्यांचे मोबाईल तपासले आणि या मुलांनी खरोखरच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवला होता असं दिसलं. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीन शॉट घेऊन त्यांचे फोन ताब्यात घेतले. “या दोन्ही तरुणांच्या वागण्या-बोलण्यावरुन त्यांना 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची होती असं दिसत होतं,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, यानंतर दोन्ही तरुणांवर सीआरपीसी (CRPC) कलम 151(3) अन्वये प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई करण्यात आली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी या संदर्भातील माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्या दोघांना सोडून देण्यात आलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community