Thackeray Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर

मतदारसंघातील आढावा जाणून घेण्यासाठी आजपासून बैठकांच सत्र

124
Thackeray Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर

राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यानंतर ठाकरे गटाला (Thackeray Group) गळती लागली आहे. आधी आमदार, खासदार मग नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाची वाट धरली होती. यानंतर दोन्ही गट अनेकवेळा आमनेसामने आले. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या धरतीवर आत्तापासूनच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून (१६ ऑगस्ट) बैठका सुरु केल्या आहेत.

(हेही वाचा – Earthquake : कोल्हापुरात जाणवले भूकंपाचे सौम्य झटके)

आजपासून नंदुरबार,धुळे,रावेर,जळगाव लोकसभा मतदारसंघातील चाचपणी तसेच इथला आढावा घेण्यासाठी बैठकाचं (Thackeray Group) आयोजन करण्यात आलं आहे. १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण १६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला मतदारसंघातील आमदार, खासदार, पदाधिकारी, विभागप्रमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Thackeray Group) यावेळी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करुन आगामी रणनिती ठरवणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.