Chandrayaan-3 : यान चंद्राच्या शेवटच्या कक्षेत दाखल

इस्रोने ट्विट करत दिली माहिती

179
Chandrayaan-3 : यान चंद्राच्या शेवटच्या कक्षेत दाखल

भारताची चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ही मोहिम यशस्वीपणे पुढे जात आहे. चांद्रयानने आज, बुधवारी सकाळी 8.30 वाजता आणखी एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयानच्या चंद्राभोवतीच्या क्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच प्रॉपल्शन आणि लँडर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. इस्त्रोने ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे.

इस्त्रोच्या माहितीनुसार ‘सध्या चांद्रयान (Chandrayaan-3) हे चंद्राभोवती 153×163 एवढ्या कक्षेत फिरत आहे. पुढिल टप्प्यामध्ये उद्या 17 ऑगस्टला प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. पण, याबाबत इस्त्रोने काहीही तपशिल दिलेला नाही. चांद्रयानमध्ये असलेल्या लँडरमध्ये रोव्हर फिट करण्यात आले आहे. या दोन्हीला मिळून लँडर मॉड्यूल बोलले जाते.

(हेही वाचा – Earthquake : कोल्हापुरात जाणवले भूकंपाचे सौम्य झटके)

आता प्रॉपक्शन मॉड्यूल हे लँडर मॉड्यूलला चंद्रापासून (Chandrayaan-3) 100 किलोमीटर उंचीवरील कक्षेत नेणार आहे. यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे होणार आहे. लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी प्रवास करेल. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. तसेच ही मोहिम पूर्ण झाल्यास भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 (Chandrayaan-3) मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) शनिवारी (5 ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं घेतली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.