- ऋजुता लुकतुके
विंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघाचा आयर्लंड दौरा आता सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन सामन्यांच्या छोटेखानी दौऱ्यासाठी डब्लिनला पोहोचला आहे. जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघ आयर्लंडची राजधानी डब्लिन इथं पोहोचला आहे. इथं हा संघ तीन टी-२० सामने खेळणार आहे. १८ ऑगस्टला मलाहाईड इथं पहिला टी-२० सामना रंगणार आहे. भारतीय संघ मुंबईहून डब्लिनसाठी रवाना झाला तेव्हाचे फोटो बीसीसीआयने ट्विट केले आहेत.
Ireland 🇮🇪, here we come ✈️ #TeamIndia | #IREvIND pic.twitter.com/A4P66WZJzP
— BCCI (@BCCI) August 15, 2023
बीसीसीआयच्या इन्स्टाग्राम खात्यावरही भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंचे फोटो टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये नवीन कर्णधार जसप्रीत बुमरा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, प्रसिध कृष्णा आणि शिवम दुबे दिसत आहेत.
खासकरून जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे झालेल्या मोठ्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतोय. त्यामुळे ही मालिका त्याच्या तंदुरुस्तीसाठी महत्त्वाची आहे. तर विंडिज दौऱ्यात भारताची मधली फळी आणि तेज गोलंदाजीतील कच्चे दुवे उघड झाले होते. त्यामुळे आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या संघ निवडीसाठी ही मालिका महत्त्वाची ठरेल. फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे तर तेज गोलंदाजीत बुमराबरोबरच प्रसिध कृष्णाच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असेल. विंडिज दौऱ्यात खेळलेले यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा हे खेळाडूही या संघात आहेत. तर संजू सॅमसनसाठी कदाचित ही शेवटची संधी असेल.
(हेही वाचा – Palm Oil : अकरा राज्यांमध्ये ‘इतक्या’ हेक्टरवर पाम तेल वृक्षांची लागवड, खाद्यतेल वाढवण्यावर भर)
आयर्लंड दौऱ्याचा कार्यक्रम,
१८ ऑगस्ट – पहिला टी-२० सामना – मालाहाईट
२० ऑगस्ट – दुसरा टी-२० सामना – डब्लिन
२३ ऑगस्ट – तिसरा टी-२० सामना – डब्लिन
आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे, जसप्रीत बुमरा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाध अहमद, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community