खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या (Pune Dam) पाणलोट क्षेत्रांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. दिवसभरात पावसाने उघडीप दिली. धरणांच्या परिसरात कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे एकूण पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पानशेत धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून आंबी नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
(हेही वाचा – Rushi Sunak : मी आधी हिंदू आहे, नंतर पंतप्रधान – ऋषी सुनक)
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला (Pune Dam) या ४ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून एकूण २६.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली, तर वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे तीन मिलिमीटर आणि एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
सध्या टेमघर (Pune Dam) धरणात २.६६ टीएमसी (७१.६३ टक्के), वरसगाव धरणात ११.७३ टीएमसी (९१.४७ टक्के), पानशेत धरणात १०.६५ टीएमसी (१०० टक्के) आणि खडकवासला धरणात १.४५ टीएमसी (७३.५३ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community