Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी जाहीर केली शब्दावली

253

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आणि युक्तिवादांमध्ये यापुढे जेंडर स्टिरियोटाइप शब्द वापरले जाणार नाहीत. महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जेंडर स्टिरियोटाइप कॉम्बॅट हँडबुक लाँच केले आहे.

8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाने झालेल्या एका कार्यक्रमात कायदेशीर बाबींमध्ये महिलांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर थांबेल, लवकरच एक शब्दकोशही येईल, असे म्हटले होते. बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी हँडबुकचे प्रकाशन करताना, CJI चंद्रचूड म्हणाले की, कोणते शब्द रूढीवादी आहेत आणि ते कसे टाळायचे हे न्यायाधीश आणि वकिलांना समजणे सोपे होईल.

जेंडर स्टिरियोटाइप कॉम्बॅट हँडबुकमध्ये काय?

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, या हँडबुकमध्ये आक्षेपार्ह शब्दांची यादी असून त्या जागी वापरायचे शब्द व वाक्ये देण्यात आली आहेत. न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी, आदेश देण्यासाठी आणि त्याच्या प्रति तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. हे हँडबुक वकिलांसाठी तसेच न्यायाधीशांसाठी आहे. या हँडबुकमध्ये पूर्वी न्यायालयांनी वापरलेले शब्द आहेत. शब्द का चुकीचे आहेत आणि ते कायद्याचे आणखी विपर्यास कसे करू शकतात हेदेखील स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा Thackeray Group : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर)

पर्यायी शब्द 

  • अफेअर – विवाहबाह्य संबंध
  • प्रॉस्टिट्यूट/हुकर (पतुरिया) – सेक्स वर्कर
  • अनवेड मदर (बिनलग्नाची आई) – आई
  • चाइल्ड प्राॅस्टिट्यूट – तस्करी करून आणलेले मूल
  • बास्टर्ड – असे मूल ज्या आईवडिलांनी लग्न केलेले नाही
  • ईव्ह टीजिंग – स्ट्रीट सेक्शुअल हरॅसमेंट
  • प्रोवोकेटिव्ह क्लोदिंग/ड्रेस (उत्तेजक कपडे) – क्लोदिंग/ड्रेस
  • एफेमिनेट (जनाना) – याएवेजी जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर
  • गुड वाइफ – वाइफ (पत्नी)
  • कॉन्क्युबाइन/कीप (रखेल) – अशी महिला जिचे लग्नाशिवाय इतर पुरुषांशी संबंध असतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.