मुलुंड सेवा संघाच्यावतीने Mulund Seva Sangh गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा येत्या शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी पार पडत असून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सलग २५ वर्षे या संघाच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जात आहे. यंदा १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार असून या संघाच्यावतीने विद्यार्थी गौरव उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक सहाय्य, शाळा प्रवेशासाठी सहकार्य, पुस्तके, वह्या आणि शालोपयोगी इतर प्रकारचीही मदत केली जात आहे.
मुलुंड सेवा संघ ही अशीच ‘सेवाही व्रत, सेवाही धर्म’, हे ब्रीद समोर ठेवून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेली संस्था आहे. १६ नोव्हेंबर १९९८ साली म्हणजे तब्बल २५ वर्षापूर्वी संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, कार्यवाह विनायक सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलुंड पूर्वमध्ये ‘मुलुंड सेवा संघा’ची स्थापना केली. या २५ वर्षांत संघाने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात काम करताना विविध उपक्रम राबविले आहेत. गेली २५ वर्षे तो अखंड चालू ठेवला आहे. सुरवातीला छोट्याशा स्वरूपात हा उपक्रम सुरू करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गंगाधरे हे भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते आणि नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी विद्यार्थी गौरव सोहळा हा उपक्रम भारतीय जनता पार्टी, मुलुंड मंडलच्यावतीने संयुक्तपणे सुरू केला. १९९८ साली पहिल्या गुण गौरव सोहळ्यास भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आवर्जून उपस्थित होते. मुलुंड सेवा संघाने विद्यार्थी गौरव उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक सहाय्य, शाळा प्रवेशासाठी सहकार्य, पुस्तके, वह्या आणि शालोपयोगी इतर प्रकारचीही मदत केली आहे. संघाने मुलुंडमधील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केले. त्यासाठी अभ्यासिकाही चालविली. या अभ्यासिकेला राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी सदिच्छा भेट दिली होती.
( हेही वाचा – BMC Private School Salary hike :मुंबईतील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्यापासून वाढणार वेतन)