India Alliance : आघाडीत बिघाडी; नवी दिल्लीत काँग्रेसने ‘आप’ला डावलले

काँग्रेसच्या घोषणेने इंडिया आघाडीत बिघाडीची शक्यता

217
India Alliance : नवी दिल्लीतील ७ जागा लढवण्याची काँग्रेसची घोषणा
India Alliance : नवी दिल्लीतील ७ जागा लढवण्याची काँग्रेसची घोषणा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन तेथील ७ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘नवी दिल्लीतील जागांवर पक्षाचे संघटन मजबूत करून लढणार आहे. आजच्या बैठकीत आम आदमी पार्टी किंवा कोणत्याही आघाडीसंदर्भात चर्चा झाली नाही’, असे काँग्रेसचे दिल्लीतील नेते अनिल चौधरी यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी देखील आम्ही ७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून नवीन वादाला तोंड फुटले आहे.

इंडिया आघाडीची स्थापना करून विरोधी पक्षांनी भाजप विरोधात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. इंडिया आघाडीत देशातील २६ राजकीय पक्षांचा समावेश आहे. इंडिया आघाडीची पुढील आणि निर्णायक बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्यापूर्वीच इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत.

(हेही वाचा – MUMBAI Journalist Agitation : मुंबईतील हुतात्मा चौकात पत्रकारांचे राज्यव्यापी आंदोलन)

आपचा पलटवार

नवी दिल्लीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. ”अशा गोष्टी समोर येत राहतील. ज्यावेळी इंडिया आघाडीच्या पक्षांचे नेते एकत्र येतील, त्यावेळी वरिष्ठ नेतृत्त्व जागा वाटपावर चर्चा करेल. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ते त्यावेळी कळेल”, असे ते म्हणाले.

सौरभ भारद्वाज पुढे म्हणाले की, ”काँग्रेस नेत्या अलका लांबा आणि अनिल चौधरी हे छोटे नेते आहेत. त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले होते. त्या दोन्ही नेत्यांची मते एकत्र केली, तरी ते विजयी झाले नव्हते. नवी दिल्लीतील सात जागांवर लढण्यासंदर्भात आमच्या पक्षाचं केंद्रीय नेत्त्व निर्णय घेईल.”

मुंबईतील बैठकीबाबत प्रश्नचिन्ह

काँग्रेसने नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघात लढण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आल्याने आपच्या निर्णयाकडे लक्ष आहे. आपकडून मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासंदर्भात फेरविचार केला जाऊ शकतो, अशा चर्चा आहेत.

हेही पहा

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.