१९२१ साली भारतात मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरु केली, ज्याचा भारताशी काही संबंध नव्हता, त्याला गांधींनी पाठिंबा दिला. त्यावेळी मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. गांधींनी जेव्हा खिलाफत चळवळ मागे घेतली. त्यावेळी क्रांतिकारकांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले, याचे दुःख वाटले म्हणून आपण ही चळवळ मागे घेतले असल्याचे गांधी म्हणाले होते. परंतु त्याच वेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडले, त्याचा गांधींनी एका शब्दाने निषेध केला नाही. त्या खिलाफत चळवळीत मोपाल्यांनी हिंदू स्त्रियांवर अत्यंत क्रूर अत्याचार केले. त्या मोपाल्यांचा गांधींनी माय ब्रेव्ह मोपला ब्रदर्स असा उल्लेख केला. त्याच वेळी वीर सावरकर यांनी ‘या घटनेनंतरचा भारतातील मुसलमानांमध्ये फाळणीचा विचार वाढला’, असे म्हटले होते. त्याचा परिणाम पुढे १९४७ मध्ये फाळणीत झाला. जेव्हा मोपल्यांनी अत्याचार केले, तेव्हा मुसलमानांची संख्या २१ टक्के होती, फाळणीनंतर स्वतंत्र भारताची पहिल्यांदा जनगणना झाली त्यावेळी मुसलमानांची लोकसंख्या ८ टक्के होती, पण आज पुन्हा त्यांची लोकसंख्या २१ टक्के झाली आहे आणि पुन्हा १९२१ प्रमाणे मुसलमानांकडून अत्याचार होऊ लागले आहेत. देशात मुसलमान आक्रमक बनले आहेत. जे नौखालीत झाले होते, तसे आज होईल. तुमच्या नगरांवर मुसलमान ताबा मिळवतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर याचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सतर्क केले.
हिंदूंना जागृत होण्याची गरज
सम्राट अशोकाकडे मोठे सैन्य बळ होते, पण ७०-८० वर्षांनी त्याची सत्ता बुडली, कारण आत्यंतिक अहिंसा. त्यानंतर जेव्हा जेव्हा आपण लढाया जिंकलो, त्यात आपण तात्पुरते आनंदात राहिलो, पण इतिहास विसरत गेलो. इतिहासातून धडे घेतले नाही, त्याचा परिणाम म्हणून आपल्यावर नवनवीन आक्रमणे होत राहिली. शक, हूण, डच, पोर्तुगीज, ब्रिटिश, मुघल यांनी आक्रमणे केली. मुघलांमध्ये तुर्कस्थानातून आपल्यावर स्वारी झाली, अरबांकडून तीन स्वाऱ्या झाल्या. मुघल म्हणजे अत्यंत क्रूर जमात. त्या मुघलांना आपण ‘मुघल कल्चर’ म्हणतो, हे नेहरूंचे पाप आहे. जशी टोळधाड येते, सगळे नष्ट होते, तसे परकीय आक्रमणे झाली. आजही मुघलांचे अस्तित्व कायम आहे. देशभरात ठिकठिकाणी मुघलांच्या राजांची नावे आहेत. आज ७० वर्षांनंतर का होईना शासनाला जाग आली आणि ही नावे बदलली जाऊ लागली आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामकरण करण्यात आले आहे. पण आजही त्या औरंगजेबाचा फोटो डीपीवर ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे हिंदूंना जागृत होण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला इतिहास समजून घेतला पाहिजे, असेही रणजित सावरकर म्हणाले.
(हेही वाचा Gadar 2 : गदर सारख्या चित्रपटांमुळे भाईचारा निर्माण होऊ शकतो)
हिंदूंना खोटा इतिहास शिकवला
आपण का विजयी झालो होतो आणि का पराभूत झालो होतो, हे अभ्यासण्याची आवश्यकता आहे. याविषयीचे सूत्र वीर सावरकर यांनी सांगितले आहे. जेव्हा आपण हिंदू म्हणून आपल्या अस्मितेसाठी एकत्र आलो आणि लढलो, तेव्हा तेव्हा आपण विजयी झालो. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अस्मितेचा विसर पडला, आपण जातीभेदाच्या जोखड्यात अडकलो, तेव्हा तेव्हा छोट्या छोट्या शत्रूंकडून आपण पराभूत झालो. ब्रिटिश किती संख्येने आले होते, मुंबईतील लोकसंख्येइतकेही ते नव्हते, पण त्यांनी आक्रमण केले आणि सगळ्या देशावर राज्य केले. कारण हिंदूंना खोटा इतिहास शिकवला गेला. हिंदूंचा इतिहास पराभवाचा आहे, हेच शिकवले गेले. माझे मत आहे विजयाचा आणि पराभवाचा असे दोन्ही इतिहास हिंदूंना शिकवले गेले पाहिजे, असेही रणजित सावरकर म्हणाले.
१६ ऑगस्ट १९४६ भारताच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस
काल आपला ७६वा स्वातंत्र्यदिवस साजरा झाला. पण १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस होता. त्या दिवशी मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी ‘डायरेक्ट डे ॲक्शन’ आंदोलन सुरु केले. हे आंदोलन नव्हते तर हिंसाचार, दंगली होत्या. त्यावेळी बंगालचे मुख्यमंत्री शहिद सुरावर्दी होते, त्या ठिकाणी २२ पोलीस ठाण्यांपैकी २० पोलीस ठाण्याचे अधिकारी मुसलमान होते, २ पोलीस ठाण्याचे अधिकारी अँग्लो इंडियन होते. १६ ऑगस्ट १९४६ या दिवशी त्या ठिकाणी कत्लेआम सुरु झाला होता. ५ हजार हिंदूंची हत्या झाली, तरी सुरवर्दी शांत होते, पण उशिरा का होईना हिंदू समाज जागृत होतो. तेव्हा मुसलमान आणि हिंदू यांची लोकसंख्या ५० – ५० टक्के होती. त्यावेळी असाह्य झालेल्या हिंदू महिलांना गांधी म्हणायचे त्यांना सहाय्य करू नका, असेही रणजित सावरकर म्हणाले.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे विचारस्वातंत्र्य हिरावून घेतले हे निषेधार्ह
काल जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी होती. ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे भाषण होते, पण त्यांच्या भाषणामुळे जातीय तणाव वाढतो म्हणून त्यांच्या भाषणाला परवानगी देऊ नये अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आणि ७७व्या स्वातंत्र्यदिनी एका राष्ट्रभक्ताचे विचारस्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. म्हणून आता आपल्याला ‘जो हिंदू हित कि बात करेगा वही देश पे राज करेगा’ अशी भूमिका घेतली पाहिजे, यासाठी वीर सावरकर यांची जातीविरहित हिंदू समाजाची निर्मिती करणे, ही भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.
Join Our WhatsApp Community