Chandrayaan-3 : आजचा दिवस महत्वाचा

बुधवार २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल

257
Chandrayaan-3 : आजचा दिवस महत्वाचा

भारताची चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ही मोहिम यशस्वीपणे पुढे जात आहे. ही मोहीम आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यानाने बुधवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास चंद्राच्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयानाचे आता सर्व कशा बदल पूर्ण झाले असून इस्रोकडून आता यान चंद्रावर उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे.

आजपासून म्हणजेच गुरुवार १७ ऑगस्टपासून चंद्रयानाच्या (Chandrayaan-3) प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल विभक्त करण्याचा टप्पा सुरु होणार आहे. इस्रोने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज मुख्य यानापासून लँडर वेगळा केला जाणार आहे. यावेळी दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या चारही बाजूंनी १००X१०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत असतील. शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचार ते चार या वेळेत लँडर वेगळा होईल.

(हेही वाचा – Bhagavad gita : ‘या’ एका गोष्टीमुळे माणसाला सतत राग येतो; श्रीमद् भगवतगीतेत सांगितलेले उत्तर वाचा…)

यानंतर बुधवार २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल.

काही दिवसांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 (Chandrayaan-3) मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) शनिवारी (5 ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं घेतली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.