राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत असला तरी, मान्सुनने मात्र उत्तर महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याने संपूर्ण भाग अद्याप कोरडा पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगरच्या धरणांमध्ये पाणी साठाच नसल्याने शेतकरी संकटात सापडले.
पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले तरीही गोदावरी नदीला उद्याप एकदाही पूर आलेला नाही. जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्पांपैकी अनेक धरणांत ५० टक्केही पाणीसाठा नाही. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागात पाऊस होत असल्याने गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे.
(हेही वाचा – Shravan : पुरुषोत्तम मास समाप्ती, निज श्रावण मासाला सुरुवात, सोप्या पद्धतीने करा शिवआराधना)
जळगाव, नंदूरबारमध्येही बिकट परिस्थिती
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३२० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण सात लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यातील ५ लाख ६० हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र पीक परिस्थिती मध्यम स्वरूपाची आहे. मात्र, पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात अद्याप कोणत्याही भागात दुष्काळसदृश परिस्थिती नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community