ऋजुता लुकतुके
गणेश चतुर्थी, नवरात्री आणि दिवाळी असा काही आठवड्यांत देशात सणांचा हंगाम (Festive Season Jobs) सुरू होईल. आणि त्यासाठी वित्तीय क्षेत्रही जोरदार तयारी करतंय. कारण, सण साजरे करण्यासाठी किंवा नवीन खरेदी करताना लोकांना पैशाची पर्यायाने कर्जाची गरज पडते. आणि ते उपलब्ध करून देण्यासाठी बँकिंग तसंच वित्तीय क्षेत्रात चढाओढ सुरू होते. त्यामुळे पुढच्या सणांच्या दिवसांमध्ये देशात किमान ५०,००० तात्पुरत्या नोकऱ्या एकट्या वित्तीय क्षेत्रात निर्माण होणार असल्याचं टीनलीज या संस्थेनं म्हटलं आहे.
गेल्यावर्षीही याच कालावधीत १५ टक्क्यांनी नोकरभरती वाढली होती. तोच ट्रेंड आताही सुरू राहील असं टीमलीजला वाटतं. BFSI म्हणजे बँकिंग, वित्तीय संस्था आणि इन्श्युरन्स या क्षेत्रात नोकरभरती होईल.
(हेही वाचा : BJP Mission 2023 : छत्तीसगड, मध्य प्रदेशातील कमजोर जागांवर लक्ष केंद्रित करा; पंतप्रधान मोदींचा सल्ला
या काळात क्रेडिट कार्डांचा वापर वाढतो. पर्सनल फायनान्सशी संबंधित व्यवहार वाढतात. आणि ऑनलाईन पेमेंट प्रणालीच्या वापराचंही प्रमाण वाढतं. त्याचबरोबर नवीन वस्तूंच्या खरेदीबरोबर मौल्यवान खरेदीचा इन्श्युरन्स काढण्यासाठीही लोक उत्सुक असतात. अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये बॅक ऑफिसमध्ये यंत्रणा सांभाळणाऱ्या लोकांची कंपन्यांना गरज लागणार आहे. आणि तिथेच मोठ्या प्रमाणात नोकर भरती होईल,’ असं टीमलीजने आपल्या अहवालात म्हटलं आहे. या नोकऱ्या फ्रंट डेस्क, टेलिफोन एक्झिक्युटिव्ह डिजिटस मार्केटिंग अशा स्वरुपाच्या असतील. मागच्या दोन महिन्यांत २५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती झालेली आहे, असंही टीमलीजने नमूद केलं आहे. या अहवालात आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण आहे. आधीच्या हंगामात मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू अशा शहरांमध्येच अशा नोकऱ्यांचं प्रमाण जास्त होतं. पण, अलीकडे या महानगरांबरोबरच पुणे, कोलकाता आणि अहमदाबाद अशा शहरांमध्येही तात्पुरत्या नोकर भरतीचं प्रमाण वाढत आहे. तर छोटी शहरं कोची, विशाखापट्टणम्, मदुराई, चंदिगड, अमृतसर, भोपाळ आणि रायपूरमध्येही नोकर भरती वाढताना दिसतेय. बँका आणि वित्तीय क्षेत्राबरोबरच ई-कॉमर्स कंपन्यांमध्येही नोकर भरती सुरू झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी पगार वाढ
यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत मिळणाऱ्या पगारातही ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. फ्रंट ऑफिसमधील नोकऱ्यांसाठी मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये २० ते २२ हजार महिन्याला तर कोलकाता इथं १६ ते १८ हजार आणि चेन्नई इथं १७ ते २० हजार रुपये असा पगार देऊ केला जात आहे. तर टेलिऑपरेटर्सनाही १३ ते १८ हजार रुपये महिना असा पगार देणार असल्याची माहितीही संस्थेने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community