ITR RETURN :देशात ‘ही’ पाच राज्ये आयकर रिटर्न भरण्यात आघाडीवर

महाराष्ट्र राज्याचा ही समावेश

183
ITR RETURN :देशात 'ही' पाच राज्ये आयकर रिटर्न भरण्यात आघाडीवर
ITR RETURN :देशात 'ही' पाच राज्ये आयकर रिटर्न भरण्यात आघाडीवर

देशात आयकर रिटर्न ITR RETURN भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत होती. या वर्षीही जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत करोडो करदात्यांनी कर भरला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये आयकर रिटर्न भरण्यात आघाडीवर आहेत. आर्थिक  वर्ष २०२३ मध्ये भरलेल्या एकूण आयकर रिटर्नपैकी ITR RETURN या राज्यांचा वाटा ४८ टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा : Minor Girl Abduct : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न)

आर्थिक  वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ६४ लाख अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. या अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक आयटीआर आजपर्यंत भरण्यात आले आहेत . यानंतर अनुक्रमे उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि राजस्थान यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, वाढीच्या बाबतीत, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड सारख्या लहान राज्यांनी गेल्या ९ वर्षांमध्ये आयटीआर फाइलिंगमध्ये २० टक्के वाढ नोंदवली आहे. SBI ने ‘Deciphering Emerging Trends in ITR Filing’ नावाचा हा अहवाल देशातील उदयोन्मुख ट्रेंड आणि ITR फाइलिंगमधील बदलांबाबत प्रसिद्ध केला आहे. त्यात भारताच्या करप्रणालीतील सतत होणाऱ्या बदलांबाबत संशोधनाचा उल्लेखही करण्यात आला आहे. यापूर्वी, आयकर विभागाने माहिती दिली होती की मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी विक्रमी ६.७७कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत आणि ३१ जुलै २०२३ पर्यंत,५३. ६७ लाख प्रथमच आयकर रिटर्न भरणारे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.