DRDO Former Director : डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन

पंतप्रधानांसह अन्य मान्यवरांकडून शोक व्यक्त

241
DRDO Former Director : डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी महासंचालक (DRDO Former Director) पद्मभूषण डॉ. व्ही.एस अरुणाचलम यांचे बुधवारी (१६ ऑगस्ट) अमेरिकेत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. कॅलिफोर्नियातील नातेवाईकांच्या घरी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अरुणाचलम यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर (DRDO Former Director) निमोनिया आणि पार्किन्सन आजारावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, तीन मुलं रघु, मालविका, रामू आणि सहा नातवंडे असा परिवार आहे.

अरुणाचलम (DRDO Former Director) यांनी भाभा अणू संशोधन केंद्र, नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी आणि डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. २०१५ मध्ये, अरुणाचलम यांना वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी डीआरडीओचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अरुणाचलम हे डीआरडीओचे प्रमुख होते. १९८२-९२ या कालावधीत ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागारही होते. अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (१९८०), पद्मभूषण (१९८५) आणि पद्मविभूषण (१९९०) प्रदान करण्यात आले. रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे (युके) पहिले भारतीय फेलो होते. कार्नेगी मेलॉन विद्यापीठ, पिट्सबर्ग येथे एक विशिष्ट सेवा प्राध्यापक (अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरण) देखील होते.

(हेही वाचा – Make in India : मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर, 2 अब्ज युनिटची निर्मिती)

वैज्ञानिक समुदाय आणि धोरणात्मक जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली – पंतप्रधान मोदी

डॉ. अरुणाचलम (DRDO Former Director) यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदाय आणि धोरणात्मक जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे ज्ञान, संशोधनाची आवड आणि भारताच्या सुरक्षा क्षमतांना बळकट करण्यासाठी भरीव योगदानाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, डॉ. अरुणाचलम (DRDO Former Director) यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दुःख झाले. संरक्षण, तंत्रज्ञान आणि आण्विक विषयांवर ते अनेकांचे मार्गदर्शक होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.