हाजीअली येथील नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या उपहारगृहाचे नुकतेच डॉ. सुधीर मेढेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोविड काळात हे उपहारगृह बंद पडले होते. बंद पडलेले उपहारगृह अधिष्ठात्यांच्या प्रयत्नामुळे सुरु झाल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली. वसतिगृहातील उपहारगृहात जेवण बनवण्याचे केटररची नेमणूक स्वतः डॉक्टरांनी केली. एफएसआय मानांकन मिळालेल्या एन केटरर्सची निवड आम्ही केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांना चांगल्या दर्ज्यचा सकस आहार मिळणार आल्याची आम्ही डॉक्टरांनीच खात्री केल्याचे सांगण्यात आले.
कोविड काळात पालिका रुग्णालयापैकी नायर रुग्णालयात कोरोनाबाधित गर्भवती महिलांची प्रसूती आणि नवजात शिशुच्या देखभालाची जबाबदारी होती. एरव्ही सर्वात कमी रुग्णसंख्या असलेल्या नायर रुग्णालयात दोन्ही लॉकडाऊनकाळात रुग्णांचा मोठा ताफा होता. त्याच दरम्यान हाजीअली येथील डॉक्टरांच्या वसतीगृहातील वसतीगृह बंद पडले. त्यावेळी डॉक्टरांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताणाचा सामना करावा लागला.
(हेही वाचा – Asia Cup : आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड २० ऑगस्टला?)
तत्कालीन माजी अधिष्ठातांनी बंद पडलेल्या उपहारगृहाच्या समस्येकडे लक्ष दिले नाही अशी निवासी डॉक्टरांनी तक्रार केली. वारंवार याविषयी तक्रार करूनही अधिष्ठाता पातळीवर हा प्रश्न सुटत नव्हता. डॉक्टरांना बाहेरील अन्नपदार्थ खावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अखेरीस सध्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी उपहारगृह सुरु करण्याकडे स्वतः जातीने लक्ष दिले, असे डॉक्टरांनी सांगितले. याअगोदर उपहारगृहाचे काम अर्धवट झाले होते. मात्र डॉ. मेढेकर यांनी लक्ष घालताच तातडीने काम मार्गी लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे विद्यार्थी प्रतिनिधी झिशान भगवान यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community