Simcard : सरकारने ५२ लाख मोबाईल कनेक्शन केले बंद

६७,००० डीलर्सची नावे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत. मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

207

सरकारने फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्ड डीलर्सची पोलिस पडताळणी अनिवार्य केली आहे आणि बल्क कनेक्शन देण्याची तरतूद आता बंद करण्यात आली आहे, तसेच, सरकारने ५२ लाख मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले.

६७,००० डीलर्सची नावे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत. मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपने फसवणुकीच्या कृत्यांमध्ये गुंतलेली जवळपास ६६,००० खाती ब्लॉक केली आहेत. आता आम्ही फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्ड डीलरचे पोलिस पडताळणी अनिवार्य केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिलरला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, १० लाख सिम डीलर आहेत आणि त्यांना पोलिस पडताळणीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. याचबरोबर, दूरसंचार विभागाने मोठ्या प्रमाणात कनेक्शन देण्याची सेवाही बंद केली आहे. त्याऐवजी, व्यवसाय कनेक्शनची नवीन संकल्पना सादर केली जाईल. याशिवाय, व्यवसायांचे केवायसी आणि सिम घेणार्‍या व्यक्तीचे KYC देखील केले जाईल. तसेच, केवायसी संस्थेची किंवा गुंतवणूकदाराची ओळख आणि पत्ता प्रमाणित करण्यात मदत मिळते, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.